एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar Crime: 14 वर्षांच्या नातीला घेऊन आजी आजोबांनी लावलं लग्न; आता पोलिसांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले, नवरदेवाकडून दोन लाख...

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमधून नववीत शिकत असलेल्या 14 वर्षांच्या मुलीला आजी आजोबांनी लग्नासाठी विकायला काढल्याची संतापजनक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरच्या शेवगाव तालुक्यात आजी आजोबांनी आपल्या 15 वर्षांच्या नातीचं दोन लाख रूपये घेऊन लग्न लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय नातीला लग्नासाठी विकायला काढल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे . एका कुटुंबाकडून दोन लाख रुपये घेत 25 वर्षीय तरुणांशी 14 वर्षांच्या नातीचे लग्न लावून दिले. शरीर सुखाची मागणी करत नवऱ्याने मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली. शरीर संबंधांमुळे होणारा त्रास असह्य झाल्याने मुलीने पोलिसांना मदत मागितली. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांना मदतीसाठी याचना केल्यानंतर दामिनी पथकाकडून या मुलीची सुटका करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती देताना आई वडिल नसलेल्या मुलीला तिच्या आजी आजोबांनी लग्न करून देत दोन लाख रूपये घेतल्याची माहिती दिली आहे, (Crime News) छत्रपती संभाजीनगरमधून नववीत शिकत असलेल्या 14 वर्षांच्या मुलीला आजी आजोबांनी लग्नासाठी विकायला काढल्याची संतापजनक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी काय दिली माहिती?

पोलिसांनी माहिती देताना सांगितलं, हा बालविवाह सातारा येथे झाला. याबाबत कंट्रोल रूमला एक फोन आला होता. त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर परिस्थिती वेगळी होती. त्या लहान मुलीचे लग्न झालेलं होतं. एक जानेवारी 2025 ला तिचं लग्न झालं आहे असं तिने सांगितलं. ती 14 वर्ष आणि 11 महिन्यांची आहे. पंधरा वर्षे देखील तिला पूर्ण झालेली नाहीत. तिचे आई-वडील लहानपणी गेले असताना तिच्या आजी आणि आजोबांनी तिला सांभाळलं. घरची परिस्थिती नाजूक आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे आजी आजोबांनी तिचं लवकर लग्न केलं. तिच्या आजी आजोबांनी तिच्या नातेवाईकांमध्ये तिचं लग्न करून दिलं होतं. कायद्याच्या चौकटीत मुलगी 18 वर्षापेक्षा लहान होती, त्यामुळे तिचं लग्न लावून देणे योग्य नव्हतं मुलगी रडत होती, सांगत होती मला तिथे राहायचं नाही असंही तिचं म्हणणं होतं. 

तो परिसर ग्रामीण भागात येत होता. आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या दामिनी पथकाचे अधिकारी आहे. त्यानंतर आम्ही हद्दीची परवा न करता त्या मुलीला ग्रामीण पोलीस चिखलठाणा येथे घेऊन आलो. पुढील कारवाई चिखलठाणा पोलीस स्टेशनमध्ये केली. गुन्हे दाखल झाले. त्यानंतर त्या मुलीला बालकल्याण समिती समोर हजर करून तिची राहण्याची आणि पुढची सोय करून दिली. त्या नवरदेवाच्या घरून आजी आजोबांनी दोन लाख रुपये घेतल्याची माहिती देखील मुलींनी दिली असल्याची पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

नक्की प्रकरण काय ?

आजी आजोबांनी 14 वर्षांच्या नातीचं दोन लाख रुपये घेऊन लग्न लावून दिलं. नवऱ्याकडून सतत शारीरिक संबंधांसाठीचा त्रास असह्य झाल्याने तिने पोलिसांना मदत मागितली त्यानंतर दामिनी पथकाने या मुलीची सुटका केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या शेवगाव तालुक्यात घडला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. (Crime News)

छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 वर्षांची असताना पीडित मुलीचे वडील वारले. आई विचार न करता लेकीला सोडून गेली. आजी आजोबा व काकालाही 14 वर्षांची मुलगी नको झाली. त्यामुळे आजी-आजोबांनी एका कुटुंबाकडून दोन लाख रुपये घेऊन तिचे लग्न लावून दिले. दोन महिने पतीचा शारीरिक संबंधांसाठी त्रास असह्य झाला आणि मुलीने पोलिसांना मदत मागितली. शेवगाव तालुक्यातील नववीत शिकत असलेली ही अल्पवयीन मुलगी तिच्याच कुटुंबाला नकोशी झाली. तिच्या सख्ख्या आजी-आजोबांनी तिला लग्नासाठी विकायला काढले. देवळाली परिसरातील कुटुंबाने मुलीला मागणी घातली. मुलीने दिलेल्या माहितीनुसार आजी-आजोबांनी तिच्या सासरच्यांकडून तिच्या समोर दोन लाख रुपये घेतले. 1 जानेवारी 2025 रोजी तिचे गावातच 25 वर्षाच्या युवकासोबत लग्न लावून दिले. लग्नानंतर दोन महिन्यात पतीचा शारीरिक संबंध ठेवण्यासाठीचा त्रास असह्य झाला आणि मुलीने पोलिसांना मदत मागितली. यानंतर दामिनी पथकाने या मुलीची सुटका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत आंदोलन, गल्लीत पोलिसांची फौज; अभिजीत दीपकेंच्या संभाजीनगरमधील घराबाहेर तगडा बंदोबस्त
दिल्लीत आंदोलन, गल्लीत पोलिसांची फौज; अभिजीत दीपकेंच्या संभाजीनगरमधील घराबाहेर तगडा बंदोबस्त
Abhijeet Dipke Cockroach Janta Party protest : 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनापूर्वीच कुटुंबीयांची झोप उडाली! अभिजीत दिपकेंच्या काकांना अश्रू अनावार, म्हणाले, 'सरकार काय करेल अंदाज नाही...'
'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनापूर्वीच कुटुंबीयांची झोप उडाली! अभिजीत दिपकेंच्या काकांना अश्रू अनावार, म्हणाले, 'सरकार काय करेल अंदाज नाही...'
Cockroach Janta Party Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, कुटुंबाने छ. संभाजीनगरमधील घर सोडलं, नेमकं काय घडलं?
अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, कुटुंबाने छ. संभाजीनगरमधील घर सोडलं, नेमकं काय घडलं?
Inflation : महागाईचा फटका! केस कटिंग, दाढी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, सलून सेवा 20 टक्क्यांनी महागली, 'असे' असतील नवे दर
महागाईचा फटका! केस कटिंग, दाढी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, सलून सेवा 20 टक्क्यांनी महागली, 'असे' असतील नवे दर

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर, दिल्लीत पहिला पंप सुरू; पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर, दिल्लीत पहिला पंप सुरू; पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Shreyas iyer: और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
Embed widget