एक्स्प्लोर

Prashant Koratkar: छत्रपती शिवरायांविषयी अभद्र बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरची कुंडली निघाली, रोल्स रॉईस कार सीआयडीच्या रडारवर

Prashant Koratkar in Nagpur: छत्रपतींचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा मोठा घपला, चिटफंड घोटाळ्यातील आरोपीची ब्लॉक केलेली रोल्स रॉईस कार उडवत फिरायचा.

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांना धमकी दिल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याच्याकडे आलिशान रोल्स रॉईस कार कशी आली याचा सीआयडीने तपास सुरु केलाय . कारण ही रोल्स रॉयस हजारो कोटी रुपयांच्या चिट फंड घोटाळ्यातील आरोपी महेश मोतेवारच्या (Mahesh Motewar) मालकीची आहे . मोतेवारच्या समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड या कंपनीच्या नावावर ही गाडी आहे . मात्र, महेश मोतेवारला जेव्हा अटक झाली होती तेव्हा ही रोल्स रॉईस सीबीआयने (CBI) ब्लॉक केली होती. याचा अर्थ सीबीआयने ही गाडी विकायला बंदी घातली होती. मात्र, तरीही ती गाडी प्रशांत कोरटकर वापरात असल्याचं दिसून आले आहे . त्यामुळे राज्याच्या सीआयडीकडून ई मेल द्वारे या गाडीबद्दल माहिती विचारण्यात आली आहे . या रोल्स रॉईसची (Rolls royce car price) किंमत सात ते आठ कोटी इतकी असून कोरटकरकडे ती कशी आली याचा तपास आता सीआयडीने सुरु केला आहे. प्रशांत कोरटकरवर कोल्हापूर आणि नागपूरला गुन्हे दाखल असून कोल्हापूरच्या प्रकरणात त्याला अटकपूर्व जमीन मिळाला आहे.

देशभरातील साडेचार लाख गुंतवणूकदारांना ज्यादा परताव्याचे अमिश दाखवून तब्बल चार हजार सातशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा मोतेवारवर आरोप आहे. डिसेंबर 2015 मधे महाराष्ट्र पोलीसांनी मोतेवारला अटक केली. त्यानंतर देशभरातील 22 वेगवेगळ्या राज्यांमध्ये मोतेवारच्या विरोधात 28 गुन्हे नोंद झाले. त्यानंतर मोतेवारच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आणि त्यांचे लिलाव करण्यात आले. मोतेवारच्या जमीनी आणि वाहनांचा देखील लिलाव करण्यात आला. मात्र, मोतेवारकडे असलेली रोल्स रॉईस कार प्रशांत कोरटकर चालवत असल्याचे दिसून आले. ही रोल्स रॉईस मोतेवारच्या समृद्ध जीवन फुटडस इंडीया लीमीटेड या कंपनीच्याच नावे आहे. WB 02 AB0123 असा या गाडीचा नंबर आहे. रोल्स रॉइसच्या या घोस्ट मॉडेलची किंमत 7 ते 8 कोटी आहे. महेश मोतेवारच्या विरोधात पुढे सीबीआयने देखील कारवाई केली. महेश मोतेवार ओडीसा राज्यातील कटक कारागृहात आठ वर्षांहुन अधिक काळ कैद होता. काही दिवसांपूर्वी जामीन मिळवून तो बाहेर आला आहे. 

तत्पूर्वी प्रशांत कोरटकर याने रविवारी रात्री एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हीडिओत प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान गाताना दिसत आहे.  छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे महाराष्ट्राला जगभरात ओळखले जाते. त्यांच्या कथा ऐकून लहानाचे मोठा झालो आहे. त्यांच्या कथा अजूनही प्रेरणा देतात. छत्रपतीची राजधानी असलेला रायगडला अनेकदा भेट दिली व नतमस्तक झालो. त्यांना मी मानाचा मुजरा करतो, असे कोरटकर या व्हीडिओ म्हणताना दिसत आहे. मात्र, प्रशांत कोरटकर हा व्हिडिओ व्हायरल करून प्रतिक्रिया देत असताना पोलिसांना मात्र अजून का सापडत नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे प्रशांत कोरटकर मुद्यावरून आमदार रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे. रोहित पवार यांनी प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशात लपल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी सुद्धा गुन्हा दाखल होताच प्रशांत कोरटकर बालाघाटला पळाल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु असला, तरी अजून सापडलेला नाही. 

तपास कोल्हापूर पोलिसांच्या हातात

प्रशांत कोरटकर विरोधात नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपासही आता कोल्हापूर पोलीस करणार आहेत. नागपूर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रितसर कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

अमोल मिटकरींची टीका

प्रशांत कोरटकर ऐवजी एखादा मुस्लिम व्यक्ती बोलला असता तर अख्ख्या महाराष्ट्रात तथाकथित बांडगुळानी हैदोस घातला असता. आता मात्र सोयीने मुग गिळून गप्प आहेत. कोरटकरने केलेला ड्रामा महाराष्ट्राच्या लक्षात आलाय.शिवप्रेमी शांत आहेत याचा अर्थ केलेलं पाप धुतल्या गेलं असं होत नाही, असे वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले.

आणखी वाचा

आधी शिवरायांबद्दल अपशब्द वापरले, चारीबाजूंनी टीकेची झोड अन् गुन्हे दाखल झाल्यावर प्रशांत कोरटकरचा माज उतरला, व्हिडीओ करत म्हणाला...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
Airoli-Katai Naka Freeway: नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
Umar Khalid: 'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल

व्हिडीओ

Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा
Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय
Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
Airoli-Katai Naka Freeway: नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
Umar Khalid: 'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
'एक वर्ष जामीनासाठी अर्ज करू नका'; उमर खालिद, शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
एकनाथ शिंदे, पोलिस असतील, फॉर्म मागे घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष उभा राहून धमक्या देतोय, आमच्याकडून अजून किती पुरावे हवेत? अविनाश जाधवांचा सवाल
Shiv Sena Thackeray Group 40 Star Campaigners List: भाजप-शिंदे गटाची अजस्त्र प्रचारयंत्रणा निष्प्रभ करायला उद्धव ठाकरेंनी 40 मोहरे निवडले, आदेश भावोजींवर खास जबाबदारी, स्टार प्रचारकांच्या यादीत कोण-कोण?
भाजप-शिंदे गटाची अजस्त्र प्रचारयंत्रणा निष्प्रभ करायला उद्धव ठाकरेंनी 40 मोहरे निवडले, आदेश भावोजींवर खास जबाबदारी, स्टार प्रचारकांच्या यादीत कोण-कोण?
व्हेनेझुएलाच्या तेल संपत्तीच्या राजरोस लुटीसाठी ट्रम्प यांची पूरती तयारी; राष्ट्राध्यक्षांना बेडरूममधून उचलल्यानंतर आता महिला उपराष्ट्राध्याक्षांनाही जाहीर धमकी!
व्हेनेझुएलाच्या तेल संपत्तीच्या राजरोस लुटीसाठी ट्रम्प यांची पूरती तयारी; राष्ट्राध्यक्षांना बेडरूममधून उचलल्यानंतर आता महिला उपराष्ट्राध्याक्षांनाही जाहीर धमकी!
Avinash Jadhav On Eknath Shinde: उद्धव ठाकरेंचा उमेदवार एकनाथ शिंदेंच्या घरी; मनसेच्या अविनाश जाधवांनी व्हिडीओ दाखवला, ठाण्यात काय घडलं?
उद्धव ठाकरेंचा उमेदवार एकनाथ शिंदेंच्या घरी; अविनाश जाधवांनी व्हिडीओ दाखवला, ठाण्यात काय घडलं?
KDMC Election 2026: कल्याण-डोंबिवलीत भाजपने नव्हे तर ठाकरे गटातील नेत्यानेच सेटिंग केली, आपल्याच उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला लावले? नेमकं काय घडलं?
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंच्या गोटातील 'बिभीषणा'नेच घात केला? सेटिंग करुन आपल्याच उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला लावल्याचा आरोप, वरुण सरदेसाईंच्या नावाचाही उल्लेख
Embed widget