एक्स्प्लोर

Raksha Khadse : लेकीची छेड, रक्षा खडसेंचा संताप, आरोपींचे फोटो अन् ऑडिओ क्लीप व्हायरल, तिघांना बेड्या, छेडछाड प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?

Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय.

Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. टवाळखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणात सात जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त कोथळी विविध कार्यक्रम पार पडतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या या यात्रेत फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर रक्षा खडसे यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली असता भोई नावाच्या तरुणासह काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती, त्या पाळण्यामध्ये सुद्धा तरुण बसला. त्यानंतर काही व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु टवाळखोरांनी सुरक्षारक्षकाशी झटापट केली. 

रक्षा खडसेंनी गाठले पोलीस ठाणे, सात जणांवर गुन्हा 

यानंतर छेडछाडप्रकरणी सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची छेडछाड करणाऱ्या तरुणांना अटक न झाल्याने रक्षा खडसे आक्रमक झाल्या. टवाळखोर तरुणांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली. टवाळखोरांनी ज्या मुलींची छेड काढली त्या मुलींमध्ये काही अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. टवाळखोर व छेडखानी करुनही तरुण मोकाट असल्याने रक्षा खडसे यांनी पोलिसांना जाब विचारला. यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसात अनिकेत भोई, पीयूष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, सचिन पालवे, नितीन कोळी, किरण माळी अशा सात जणांवर 354, पोक्सो, आयटी अॅक्ट 66 (इ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ऑडीओ क्लीप व्हायरल 

या घटनेनंतर रक्षा खडसे व आरोपी पियुष मोरे यांचा फोनकॉल व्हायरल झाला. पियुष, तुमच्या जुन्या गावामध्ये त्या पोरांनी मुलीचा व्हिडिओ काढला अन् तुम्ही त्याला सपोर्ट करता. दोनवेळा तसं झालं ना, हे बघ मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय, अशा शब्दात व्हिडिओ काढणाऱ्या टवाळखोरांच्या मित्राशी खासदार रक्षा खडसे यांनी फोनवरून संवाद साधत इशारा दिला. ती माझी मुलगी होती, तिच्या सुरक्षेसाठीच मी त्या लोकांना (पोलिसांना) तिथं ठेवलेय. तुम्ही फक्त त्या आमदाराचे पाय चाटायला तिथ बसलेले आहेत. ते आमदाराचेच लोक होते ना, असेही रक्षा खडसे यांनी म्हटले. मी तुम्हा सगळ्यांना पोलिसात खेचणार आहे, तुम्ही आमदाराकडे जा किंवा शिंदे साहेबांकडे जाग. तुझा काय अधिकार आहे, त्या पोलिसाला बोलायचा. माझ्या मुलीच्या बाबतीत तू अस वागत असेल तर मी सोडणार नाही, अशा शब्दात त्यांनी रोष व्यक्त केल्याचे ऑडिओ क्लीपमध्ये दिसून आले. 

आरोपी शिंदे गटाचे कार्यकर्ते

यानंतर एफआयआरमधे नाव असलेले अनिकेत भोई, पियूष मोरे यांचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सोबतचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले. तर आरोपींमध्ये समावेश असलेला अनिकेत भोई हा शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय असलेल्या उपजिल्हाप्रमुख छोटू भोई यांचा पुतण्या आहे. त्याच्यावर यापूर्वी गुंडगिरी, हाणामारी करून गंभीर दुखापत करणे, यासारखे चार गुन्हे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तर पीयूष मोरे हा पूर्वीचा भाजपाचा माजी नगरसेवक राहिलेला असून काही दिवसांपूर्वी तो आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात सहभागी झाला आहे. तो सध्या कोणत्याही पदावर कार्यरत नाही. तर सचिन पालवे हा  शिंदे गटातील युवा शहर प्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहे. या प्रकरणातील बहुतांश आरोपी हे शिवसेना शिंदे गटात पदावर नसले तरी ते शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली. 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील? 

आरोपी हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील म्हणाले की, जे प्रकरण घडले त्याबद्दल प्रकरणाबद्दल बोलायचं झालं तर खऱ्या अर्थाने अशा पद्धतीच कोणते प्रकरण कुठेही होत असेल तर त्या गोष्टींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  

एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

या प्रकरणावर रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे म्हणाले की, ज्यांनी छेडछाड केली ते टवाळखोर नाहीत तर गुंड आहेत. त्यांच्याविरोधात आधीसुद्धा गुन्हे दाखल आहेत. या मुली जेव्हा यात्रेत गेल्या होत्या तेव्हा त्यांच्यासोबत एक पोलीस होता, या पोलिसाने गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या गुंडांनी पोलिसाला मारहाण आणि शिवीगाळ केली. या मतदारसंघात गेल्या 3-4 वर्षात गुंडगिरी वाढली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीचे संरक्षण या गुंडांना आहे, असा आरोप त्यांनी केला. मागील काळात 2-3 वर्षापूर्वी या गुंडांना संरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून फोन यायचे, असे मला स्वतः पोलिसांनी सांगितले, असे असेल तर हे दुर्दैवी आहे. गुंडांना राजकीय वरदहस्त असल्याचे त्यांनी म्हटले होते. 

छेड काढणारे विशिष्ट पक्षाचे : देवेंद्र फडणवीस 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुर्दैवाने त्या घटनेत एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत ज्यांनी अतिशय वाईट प्रकारचं काम केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून काहीना अटकही झाली आहे. इतरांनाही अटक केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे त्रास देणे, छेडछाड करणे हे अत्यंत चुकीचे आहे. कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.

त्यात नेत्याचा काय दोष : गुलाबराव पाटील 

कुणाचे फोटो कुणासोबत आहे? कोण कुणासोबत फोटो काढतो त्यात नेत्याचा काय दोष? अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. तसेच या घटनेसंदर्भात पक्ष हा मापदंड नाही. मी धुळ्याला असतांना एसपींना फोन केला होता, त्यांनी गुन्हा दाखल करून फोर्स लावल्याचे सांगितले होते. ज्याने चुकीचे केले असेल गुन्हा केला असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचा मी असल्याचे ते म्हणाले. 

आणखी वाचा 

Navneet Rana : राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
Embed widget