एक्स्प्लोर

Jaykumar Gore : इकडं हक्कभंग आणला, तिकडं जयकुमार गोरेंविरोधात आणखी एक महिला दोन दिवसांत पुराव्यानिशी समोर येणार, पीडित महिलेच्या दाव्याने खळबळ!

पीडित महिला म्हणाली की, 2015-16 दरम्यान मला जयकुमार गोरे अश्लील इमेजेस पाठवून व्हाट्सअपवर शिवीगाळ करून प्रचंड त्रास दिला आहे. याबाबत मी माफी मागण्यासाठी मी सांगितले होते.

Jaykumar Gore : ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमारे गोरे यांच्यावर महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोपानंतर खळबळ उडाली आहे. जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात जामीन मिळाल्याचे सांगत आरोप करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार आणि एका युट्यूब चॅनेलविरोधात आज विधानसभेत हक्कभंग आणला. यानंतर आता पीडित महिलेनं केलेल्या दाव्यानं जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आणखी एक महिला सर्व पुराव्यानिशी माध्यमांसमोर येणार असून त्या महिलेची कोणत्याही प्रकारे ओळख उघड करणार नसल्याचे त्या पीडित महिलेनं सांगितलं. त्यामुळे गोरे यांच्या वाढण्याची शक्यता आहे.  जयकुमार गोरे निर्दोष सुटणं अवघड होतं. मी उपकार केल्यानेच तो सुटल्याचेही त्या पीडित महिलेनं एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

मला अनेक धमकीचे फोन

पीडित महिला म्हणाली की, 2015-16 दरम्यान मला जयकुमार गोरे अश्लील इमेजेस पाठवून व्हाट्सअपवर शिवीगाळ करून प्रचंड त्रास दिला आहे. याबाबत मी माफी मागण्यासाठी मी सांगितले होते. मात्र, त्यांनी माफी न मागितल्यामुळे 2017 मध्ये त्यांच्यावर न्यायालयीन खटला दाखल केला. या दरम्यान मला अनेक धमकीचे फोन देखील आल्याचे महिलेनं म्हटलं आहे. मला या सहा वर्षांमध्ये अनेकदा मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिला होता. तरीही मी शांत होते.

मला ज्यावेळी पत्र आलं तेव्हा मी मला त्रास होत असल्यानेकलेक्टर ऑफिसला दिवसभर थांबून कलेक्टरांना ही सर्व हकीकत सांगितली. पोलीस अधीक्षकांना सुद्धा माहिती दिली. मात्र, माझी कोणी दखल घेतली नाही किंवा या गोष्टीचा तपास करण्यासाठी पोलीस आले नसल्याचे देखील त्यांनी सांगितलं.  त्यामुळे मी 17 तारखेला माझी बदनामी होत असल्याने उपोषण करणार असल्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्या म्हणाल्या. केस सुरू असल्यापासून मीडियासमोर मी कधी आले नव्हते. मात्र, मला खूप त्रास कार्यकर्ते देत असल्याने मी आज मीडियासमोर येऊन सर्व सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. 

मी केस मागे घेतल्यामुळे तो निर्दोष मुक्त

2019 मध्ये जयकुमार गोरे निवडून आल्यानंतर या केसचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी मला कोर्टामध्ये दंडवत घातला होता. मला लेखी माफीनामा घेऊन दिला होता. यामध्ये माझ्याकडून अशी चूक होणार नाही असा उल्लेख केला होता. यामुळे मी ही केस 2019 मध्ये मागे घेतली होती. मी केस मागे घेतल्यामुळे तो निर्दोष मुक्त झाल्याचे महिलेनं म्हटलं आहे. ही केस दाखल केल्यापासून मीडियासमोर कधी आले नव्हते. आता येण्याचे कारण म्हणजे माझी जी बदनामी सुरू आहे . आत्ता 24 ते 25 जानेवारीच्या दरम्यान माझ्या नावाचे निनावी पत्र आले होते. तीन ते चार महिन्यापूर्वी माझी जुनी एफआयआर आहे ती माझ्या नावासह व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल होत होती. 

मंत्री गोरे यांनी मला फ्लॅट दिले, आम्ही दुबईला गेलो याविषयी अशी बदनामी करत होते. यामुळे मी गप्प बसले तर आणखी समस्येला सामोरे जावे लागेल म्हणून मी विधानभवनासमोर आंदोलनाचा इशारा दिल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत मी राज्यपाल मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहेत आणि हा प्रकार थांबला पाहिजे हा माझा उद्देश असल्याचे महिलेनं सांगितलं.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Sanjay Raut: देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
जामनेरचा 'खड्डे महाकाल' बाहेर काढा, तरच नाशिककरांचे भवितव्य सुधारेल; शिवसैनिक आक्रमक, नाशिकमध्ये ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा
जामनेरचा 'खड्डे महाकाल' बाहेर काढा, तरच नाशिककरांचे भवितव्य सुधारेल; शिवसैनिक आक्रमक, नाशिकमध्ये ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Embed widget