Ajit Pawar on Sharad Pawar: "साहेबांच्यानंतर बारामती अजितदादाच्या मागे"; अजित पवारांच्या वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या, नेमकं म्हणाले काय?
Ajit Pawar on Sharad Pawar: After Sharad Pawar Baramati is behind Ajitdada says Deputy CM Ajit Pawar Baramati Vidhan Sabha Election Yugendra Pawar Shrinivas Pawar Marathi News
Ajit Pawar on Sharad Pawar: बारामती विधानसभेवरुन (Baramati Vidhan Sabha Election) अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना टोला लगावलाय. माझ्या भावाला मी निरोप पाठवला होता, माझ्याविरोधात मुलाला उभा करु नकोस, पण त्यांना वाटलं साहेबांच्या मागे बारामती आहे. पण त्यांना काय माहीत साहेबांच्यानंतर बारामती अजित पवारांच्या मागे आहे, असा टोला अजित पवारांनी शरद पवारांना लगावला आहे. तसंच आपल्या बंधुंनी मुलाला उभं केलं तरी बहिणींनी निवडणुकीत वाचवलं, असंही अजितदादा पुढे बोलताना म्हणाले आहेत.
अजित पवार म्हणाले की, "माझ्या भागात आमचा लोकसभेचा उमेदवार 48 हजारांनी पडला. मी माझ्या भावाला निरोप पाठवला, अरे नको माझ्याविरोधात तुझ्या पोराला उभं करू, अरे नाय, बारामती साहेबांच्या मागं आहे, असं मला सांगितलं. मी म्हटलं, आहे की, मी कुठे नाही म्हणतोय. पण, साहेबांचा नंबर झाल्यावर बारामती दादांच्या मागे आहे. म्हणून मला लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं. मी आपला गप्प बसलो. सगळं खानदान माझ्याविरोधात प्रचार करत होतं."
सरकारला दृष्ट लावू नये, म्हणून देवगिरीवर काळी बाहुलीच बांधतो : अजित पवार
"लोकसभेला जागा कमी आल्या त्यामुळे विधानसभेला 25 टक्के जागा घेतल्या अधाशासारख्या जागा मगितल्या नाहीत. सध्या आमचे चांगले सुरूय... सरकारला दृष्ट लावू नये, म्हणून देवगिरीवर काळी बाहुलीच बांधतो.", असंही अजित पवार म्हणाले आहेत.
लाडकी बहीण योजना अजिबात बंद करणार नाही : अजित पवार
"लोकसभेला मोठा फटका बसला, त्यानंतर शेतकऱ्यांना वीज माफीचा निर्णय घेतला. लाडकी बहिणीनं मी मी म्हणाऱ्यांना घरी बसवलं, आता व्यवस्थित कारभार होईल. लाडकी बहीण योजना अजिबात बंद करणार नाही. जो इनकम टॅक्स भरतोय त्यांना का फुकट पैसे द्यायचे? आधी म्हणायचे दीड हजारात काय होतं? आता दिसले दीड हजारात काय होते ते...", असंही अजित पवार म्हणाले आहेत.
पाहा व्हिडीओ : सगळं खानदान माझ्याविरोधात प्रचार करत होतं, पण बहिणींनी वाचवलं : अजित पवार