एक्स्प्लोर

मराठा आंदोलक आक्रमक! परभणीत नेत्यांच्या बॅनरला फासले काळे; तरूणांची जोरदार घोषणाबाजी

Maratha Protesters Aggressive : परभणीत राजकीय नेत्यांच्या बॅनरला काळे फासण्यात आले आहेत. यावेळी तरूणांची जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली. 

परभणी : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणीसाठी परभणीत मराठा आंदोलक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना (Pratap Patil Chikhalikar) मराठा आंदोलकांनी अडवल्याची घटना ताजी असतानाच, आता परभणीत राजकीय नेत्यांच्या बॅनरला काळे फासण्यात आले आहेत. यावेळी तरूणांची जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली. 

परभणी तालुक्यातील शहापूर येथे आज पाच कोटी रुपयांच्या रस्त्याचा शुभारंभ होणार आहे. या अनुषंगाने शहापूरमध्ये महाविकास आघाडीच्या खासदार डॉ. फौजिया खान, सेनेचे खासदार बंडू जाधव, सेनेचे आमदार राहुल पाटील तसेच काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांचे फोटो असलेले बॅनर लावण्यात आले होते. मात्र, मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या चौकशीच्या अनुषंगाने नाराज असलेल्या मराठा समाजातील तरुणांनी या बॅनरला काळे फासत जोरदार घोषणाबाजी केली आहे. 'मनोज जरांगे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है', 'या राजकारण्यांचे करायचे काय, खाली मुंडके वरती पाय' अशा घोषणा देण्यात आल्या आहेत.

परभणीत मराठा समाज आक्रमक

परभणी जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक होतांना दिसतोय. काल खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना अडवत मनोज जरांगे पाटील यांच्याऐवजी आदर्श घोटाळ्याची एअसायटी चौकशी लावा असा सवाल विचारण्यात आला. त्यानंतर आता परभणीतील शहापूरमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बॅनरला काळे फासण्यात आले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून परभणीत मराठा समाज आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. 

मनोज जरांगे ओबीसी आरक्षणावर ठाम...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्यात यावे आणि सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच आपल्या याच मागणीवर आपण ठाम असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. तर आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच असणार असल्याचे देखील जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळू नयेत अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असल्याचा देखील आरोप जरांगे यांनी केला आहे. तर, काही दिवस सरकारची भूमिका पाहून, त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

मराठा आंदोलक आक्रमक, चिखलीकरांचा ताफा अडवला; आदर्श घोटाळ्याचीही एसआयटी लावण्याची केली मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Jalgaon Crime : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal Majha Vision : सावरकर ते औरंजेबाची कबर...हर्षवर्धन सपकाळांची स्फोटक मुलाखतDevendra Fadnavis Majha Vision Full : बेधडक उत्तरं, तुफान फटकबाजी! दवेंद्र फडणवीस भरभरुन बोलले..Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिल्यास...Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिला, तर...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Jalgaon Crime : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
Vijay Wadettiwar & Yogesh Kadam : महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
Imtiaz Jaleel Majha Vision : औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांकडून प्रश्नांची सरबत्ती
औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांकडून प्रश्नांची सरबत्ती
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Embed widget