एक्स्प्लोर

परभणी जिल्ह्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Parbhani : जिल्ह्यात शुक्रवार व शनिवारी तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Parbhani Unseasonal Rain News : मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाकडून परभणी जिल्ह्यासाठी (Parbhani District) पुढील दोन दिवस येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात शुक्रवार (7 एप्रिल) आणि शनिवारी (8 एप्रिल) तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सचिव महेश वडदकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. 

आधीच अतिवृष्टी आणि त्यानंतर मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाकडून  वर्तवण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका फळबागांना अधिक बसण्याची शक्यता आहे. 

प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन...

परभणी जिल्ह्यात विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे. मोकळ्या जागेत असल्यास किंवा जवळपास सुरक्षित ठिकाण नसल्यास सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे. विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीमध्ये आश्रय घ्यावा. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका, घरात असल्यास चालू विद्युत उपकरणे त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे. 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूचना

तसेच पाण्यात उभे असल्यास तात्काळ बाहेर पडावे. तसेच नागरिक आणि शेतकऱ्यांनी आपला शेतमाल आणि पशुधन वेळेतच सुरक्षित जागी ठेवण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे सचिव श्री. वडदकर यांनी दिल्या आहेत. तसेच आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करणे टाळावे. शॉवरखाली आंघोळ करु नये. घरातील नळ, जलवाहिनींना स्पर्श करु नये आणि कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करणे टाळावे. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे वाहत असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबू किंवा शेड, तसेच उंच झाडांचा आसरा घेऊ नये. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नये. तसेच घरात असल्यास उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नये, अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव वडदकर यांनी दिल्या आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Farmer Success Story : पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत भाजीपाला शेतीतून लाखोंचं उत्पन्न, परभणीतील प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget