Nashik News : नाशिकच्या आकांक्षाचा मेक्सिकोत डंका, वेटलिफ्टिंगमध्ये ठरली रौप्यपदकाची मानकरी
Nashik News : मेक्सिकोतील लिओन येथे सुरु असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये मनमाड येथील आकांक्षा किशोर व्यवहारे हिने भारतासाठी रौप्यपदक मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

Nashik News : मेक्सिकोतील (Mexico) लिओन येथे सुरु असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग (World Youth Wetlifting) चॅम्पियनशिपमध्ये मनमाड येथील आकांक्षा किशोर व्यवहारे हिने भारतासाठी रौप्यपदक मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आकाक्षांने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 40 किलो वजनी गटात भारतासाठी 59 किलो स्नॅच व 68 किलो क्लिन जर्क असे 127 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले आहे.
मूळची नाशिक जिल्ह्यातील (Nashik) मनमाड (Manmad) येथील राहणार असेलली आकांक्षा हिच्या कामगिरीने नाशिकच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे. या कामगिरीमुळे वेटलिफ्टिंग खेळात मनमाडचे नाव जागतिक पातळीवर चमकले आहे. आकांक्षा ही मनमाड येथील गुरू गोविंद सिंग हायस्कूल तसेच जय भवानी व्यायामशाळेची विद्यार्थिनी आहे. मेक्सिकोत सुरू असलेल्या जागतिक यूथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून दिले. अतिशय चुरशीच्या या लढतीत 59 किलो स्नॅच, 68 किलो क्लिन जर्क असे 127 किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावले आहे.
मनमाड येथील गुरू गोविंद हायस्कुलमध्ये इयत्ता 10 वी मध्ये शिकणाऱ्या आकांक्षाने जय भवानी व्यायाम शाळेत प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली वेटलिफ्टिंगचे धडे गिरवले. 08 वी मध्ये असल्यापासून तिने वेटलिफ्टिंगचा सराव सुरु केला. पुरुषी खेळ असतांनाही आकांक्षाने मुली देखील कमी नाही असे दाखवत सक्षमपणे भार उचलित राहिली. आकांक्षांच्या कुटुंबियांना तिला वेळोवेळी पाठबळ देत वेळ लिफ्टिंग सारख्या वेटलिफ्टिंगसारख्या मर्दानी खेळात तील उतरू दिले. व्यवहारे कुटुंबीयांच्या पाठबळाचे आज चीज झाले आहे.
दरम्यान आकांक्षा आणि प्रशिक्षक म्हणून तृप्ती पाराशर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग दुसऱ्यांदा समस्त मनमाडकर आणि महाराष्ट्रसाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. मनमाडच्या क्रीडा इतिहासात जागतिक यूथ वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावणारी आकांक्षा पहिलीच खेळाडू ठरली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेल रौप्यपदक ही समस्त भारतीय व महाराष्ट्रातील महिला खेळाडूंना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
आतापर्यंतची कामगिरी
आकांक्षाला पहिल्यापासूनच खेळाची आवड होती. मात्र जेव्हा वेटलिफ्टिंग कार्यच असं ठरलं. तिने अधिकामेहांत घेण्यास सुरवात केली. घर, शाळा आणि व्यायामशाळा या पलीकडे आकांक्षाने आपला वेळ खर्ची घातला नाही. सकाळ-संध्याकाळ जयभवानी व्यायाम शाळेत प्रशिक्षक व्यवहारे यांच्या सोबत प्रॅक्टिस करत राहिली. जिल्ह्यात, राज्यात अथवा देशात कुठेही स्पर्धा असो स्पर्धेत भाग घ्यायचा आणि पदक आणायचेच. असा तिचा नित्यक्रम होता. त्यामुळे वयाच्या 12 व्या वर्षी वेटलिफ्टिंगला सुरवात झाल्यानंतर आतापर्यंत राष्ट्रीयस्तरावर दोन सुवर्णपदके प्राप्त केली असून 2021 मध्ये पतियाळा येथे 40 किलो वजनी गटात सुवर्णपदक व 2022 मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत सहा नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करीत सुवर्णपदक व स्पर्धेतील युथ मुलींचा राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
