Nashik Prevent Child Marriage : नाशिकमधील बालविवाह रोखण्यासाठी 'प्रबोधनाचा जागर', युनिसेफ आणि जिल्हा परिषदेचा पुढाकार
Nashik Prevent Child Marriage : नाशिकमधील (Nashik) बालविवाह (child Marriage) रोखण्यासाठी यंत्रणांना संघटीत व समन्वयाने काम करून 'प्रबोधनाचा जागर' मांडणं आवश्यक आहे. तर हे चित्र बदलेल.
Nashik Prevent Child Marriage : नाशिक (Nashik district) जिल्ह्यात मागील काही महिन्यात अनेक बालविवाह रोखण्यात (Child marriege) प्रशासनाला यश आले. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे, बालविवाहामुळे मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होते, तसेच तिला अनेक शारीरिक व्याधीना ही सामोरे जावे लागते. त्यासाठी तिच्या आई वडिलांचे प्रबोधन (Prevent) करून बालविवाह रोखणे ही काळाची गरज असल्याचे झेडपी सीईओ लीना बनसोड (ZP CEO Leena Bansod) यांनी सांगितले.
दरम्यान अनेकदा वर्तमानपत्रांमध्ये महाराष्ट्रात कुठे तरी बालविवाह झाला किंवा थांबवला, अशा बातम्या येत आहेत. नाशिक जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांत बाल विवाहाची प्रकरणे पुढे आली. या सर्वांवर मात करण्यासाठी नेमकं काय करायला हवं याचा विचार विमर्श करण्यासाठी नाशिकमध्ये संयुक्त बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात महिला व बालकल्याण विभाग आणि यूनिसेफ (UNICEF) या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
दरम्यान ग्रामीण भागात बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणेतील सर्व घटकांनी एकत्र येत काम करावे, अंगणवाडी सेविकांनी किशोरवयीन मुलींचे मेळावे घ्यावे व महिला बचत गटांच्या मासिक सभा, ग्रामसभा यामध्ये बालविवाह रोखण्यासाठी प्रबोधन करत लोकसहभागातून बालविवाह थांबवण्यासह बालविवाह करण्याच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी काम करावे असे निर्देश या बैठकीत दिले.
बालविवाहाच्या घटना
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव मध्ये साडेचौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलगी व साडेवीस वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा विवाह होणार असल्याचे प्रशासनाला कळाले, यावेळी प्रशासनाने तात्काळ देवगाव येथे विवाह स्थळ गाठत हळदीच्या दिवशी अल्पवयीन मुलगा-मुलगी व दोघांचे कुटुंबीय यांचे समुपदेशन करून हा विवाह थांबवण्यात आला.
निफाड तालुक्यातल्या तारुखेडले या गावातील 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह होत असतांना प्रशासनाने वेळीच दखल घेऊन अल्पवयीन मुलीच्या शाळेत जाऊन जन्म तारखेची पडताळणी केली आणि मुलीसह आई वडिलांचे समुपदेशन करत हा विवाह बेकायदेशीर आहे, त्याचबरोबर हा विवाह झाल्यास तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे सांगत समुपदेशन केले आणि हा विवाह थांबवण्यात आला.
युनिसेफच्या सीमा कानोळे म्हणाल्या कि, युनिसेफ बालविवाह थांबवायचे असतील तर हे चित्र बदलावे लागेल. यासाठी यंत्रणांनी संघटीत व समन्वयाने काम करावे लागेल. ग्रामसेवक, पोलिस पाटील व अंगणवाडी सेविका या सर्वांनी गावपातळीवर एकत्रित काम करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांचे प्रशिक्षण व्हावे. बालकांशी निगडित योजना या कशा प्रकारे राबवाव्यात? या सर्व कामात बालविकास उपमुख्य अधिकारी व पंचायत उपमुख्य अधिकारी यांची भूमिका महत्त्वाची आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड म्हणाल्या कि, जिल्हा परिषद नाशिक बालविवाह रोखणे, हि काळाची गरज असून त्यासाठी प्रशासन उपक्रम राबविण्यावर भर देत आहे. बालविवाह रोखण्यासाठी राज्य पातळीवर कृती आराखडा तयार करायला हवा व तो राबवायला हवा. कायदा राबविण्यासाठी जबाबदार असलेल्या सर्वांचे प्रशिक्षण आवश्यक आहे. नुसता कायदा नाही, तर त्यामागचे सामाजिक प्रश्न समजून घेणे गरजेचे आहे. म्हणून तळागाळातील लोकांपर्यंत हा प्रश्न समजून सांगण्यासाठी प्रबोधनाचा मांडणं महत्वाचं आहे.