एक्स्प्लोर
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
Pune Accident News : पुण्यातील हिंजवडीत मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Pune Accident News : पुण्यातील हिंजवडीत मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगानं निघालेला रेडिमिक्स डंपर पलटी होऊन हा अपघात झाला. यामध्ये डंपरखाली दुचाकीवर असलेल्या दोन महिलांचा दबून मृत्यू झाला आहे. वळणावर चालकाचे नियंत्र सुटल्यानं हा अपघात झाला आहे.
डंपरखाली दुचाकी दबल्यानं जागीच महिलांचा मृत्यू
डंपरखाली दुचाकी दबल्यानं जागीच दुचाकीवरील महिलांचा मृत्यू झाला आहे. क्रेनच्या साह्यानं रेडिमिक्स डंपर हटवण्यात आला आहे. चालकाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मृत महिलांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. या महिलांचं वय अंदाजे 20 ते 25 वर्षे असून त्या नोकरी करत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
क्रीडा
विश्व
Advertisement