एक्स्प्लोर

ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत

Sugarcane : राज्यातील काही भागातील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण, ऊसावर मोठ्या प्रमाणात काळ्या आणि पांढऱ्या माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे.

Sugarcane : राज्यातील काही भागातील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण, ऊसावर मोठ्या प्रमाणात काळ्या आणि पांढऱ्या माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळं ऊसाचं पीक येतं की वाया जातं? अशी स्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात ऊसावर या काळ्या आणि पांढऱ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. दरम्यान, याबाबत तातडीनं कृषी विभागानं उपाययोजना कराव्यात असी मागणी शेतकऱ्यांसह प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबात कृषी अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलंआहे. 

चांगल्या पावसामुळं ऊसाच्या लागवडी वाढल्या, मात्र...

राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेलं उजनी धरण हे माढा तालुक्यात आहे. या धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊसाचं क्षेत्र आहे. मागील वर्षी कमी पावसामुळं अनेक शेतकऱ्यांनी ऊसाचे पीक काढून टाकले होते. मात्र, यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. उजनी धरण देखील 100 टक्के भरलं आहे, त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाच्या लागवडी केल्या आहेत. मात्र, अचानक ऊसावर या काळ्या आणि पांढऱ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडले आहेत. ऊसाची लागण करुन दोन ते तीन महिनेच झाले नाहीत, तोवर ऊसावर रोग पडल्यानं पीक हाती येतं की नाही? अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

कृषी विभागानं उपायोजना सुचवाव्यात

माढा तालुक्यातील प्रामुख्याने उसाचे मुख्य पीक घेतले जाते. ऊस पीक हे आज पर्यंत नगदी पीक आणि  बिगर रोगाचे म्हणून उत्पादन घेतले जात होते. ऊसावर रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. विविध कीटक नाशके आणि बुरशी नाशकांची 2 ते 3 वेळा वेळा फवारणी करून देखील प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येत नाही. त्यामुळे  उसाचे पीक हे करपून चालले आहे. त्याची पाने पिवळी पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आले. त्या गोष्टीकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे मत प्रहार शेतकरी संघटनेते जिल्हा समन्वयक पंडीत साळुंके यांनी व्यक्त केले.  दोन महिने झाले उसावरील रोगाने शेतकरी हैराण असताना कृषी विभाग अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यास तयार नाही. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या रोगांवर शेतकऱ्यांना उपाय योजना सुचवून या संकटातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी पाऊल उचलण्याची विनंती प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदनद्वारे करण्यात आली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

बारामतीचा नादच खुळा... AI च्या माध्यमातून ऊस शेती, सत्या नाडेलांकडून ADT चं कौतुक; शरद पवारांचं खास ट्विट

महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget