Maharashtra Cabinet Expansion : शिंदे सरकाराच्या मंत्री मंडळात उत्तर महाराष्ट्राला भरभरून, तब्बल पाच मंत्र्यांचा ताफा
Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde Fadnavis Government) मंत्री मंडळ विस्तार पार पडला असून यामध्ये उत्तर महाराष्ट्रातून तब्बल पाच आमदारांची मंत्री पदी वर्णी लागली आहे.
Maharashtra Cabinet Exapansion : शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis Government) सरकारचा मंत्री मंडळ विस्तार पार पडला असून यामध्ये उत्तर महाराष्ट्रातून तब्बल पाच आमदारांची मंत्री पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळात उत्तर महाराष्ट्राला झुकते माप दिले आहे. मालेगावचे दादा भुसे (Dada Bhuse), जळगावचे गिरीश महाजन (Girish Mahajan), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), नंदुरबाराचे विजयकुमार गावित यांच्यासह नगरचे राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्री मंडळात स्थान दिले आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) अखेर आज 40 व्या दिवशी विस्तार झाला आहे. 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) पार पडला. आज 11 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे (Eknath Shinde) नऊ तर भाजपकडून (BJP) नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.
दरम्यान या मंत्री मंडळात उत्तर महाराष्ट्रातील पाच आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अहमदनगरचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांची वर्णी लागली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सहकारातील मोठे नेते म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. राधाकृष्ण विखे पाटील हे 1995 पासून विधानसभेत आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. या काळात कृषी, जलसंधारण, शालेय शिक्षण, परिवहनसह अनेक महत्वाच्या खात्यांचा मंत्रिपदाचा अनुभव त्यांना आहे. काँग्रेस , शिवसेना परत काँग्रेस व आता भाजप असा विखे पाटलांचा राजकीय प्रवास आहे. त्यानंतर जळगावचे गिरीश महाजन (Girish Mahajan) हे गेल्या पस्तीस वर्षांचा पासून भाजपाशी एकनिष्ठ असून गेल्या सहा टर्म पासून ते आमदार राहिले आहेत. रुग्ण सेवा या विषयावर त्यांना मानणारा मोठा वर्ग जळगाव जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यभरात आहे. भाजप मधे संकट मोचक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. फडणवीस यांच्या अतिशय निकटवर्तीय आहेत. गेल्या पस्तीस वर्षांच्या पासून संघाचे कार्यकर्ते राहिले आहेत. एकनाथ खडसे यांना शह देणारा नेता म्हणून त्यांच्या कडे पाहिले जाते.
तर कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे देखील जळगाव जिल्ह्यातून येतात. एक साधा पानटपरीवाला ते थेट मंत्रीपदापर्यंत त्यांनी मुसंडी मारली आहे. मात्र, हा पल्ला गाठताना त्यांना प्रचंड संघर्षही करावा लागला आहे. शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा आज विस्तार होत आहे. जळगाव जिल्ह्यातून आलेले गुलाबराव पाटील यांचे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान शिंदे गटात सर्वात चर्चेत असलेले मालेगाव बाह्य चे दादा भुसे याना देखील मंत्रीपद मिळाले आहे. दादा भुसे (Dadaji Bhuse) हे ठाकरे सरकारच्या काळात कृषिमंत्री म्हणून कारभार पाहत होते. काही दिवसांपूर्वी राज्यात विलक्षण घडामोडी घडल्या. शिवसेनेचे एकनिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत वेगळी वाट चोखळली. यात अनेक वर्षांपासून मैत्री जपणारे दादा भुसे देखील सामील होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासूनच पुन्हा एकदा दादा भुसेंना लाल दिवा फिक्स होता. आता नव्याने होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दादा भुसे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले.
तसेच नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांची देखील शिंदे सरकारच्या मंत्री मंडळात वर्णी लागली आहे. आपल्या डॉक्टरकीचा उपयोग नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या उत्थानासाठी करणारे आणि घरातूनच समाजसेवेचे बाळकडू प्राप्त झालेले, सध्या भाजपमध्ये असलेले आणि २००० सालापासून आमदार म्हणून निवडून येत असलेले डॉ. विजयकुमार गावित यांची पुन्हा कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आदिवासींच्या सेवेसाठी गावितांना मंत्री मंडळात स्थान देण्यात आले स्थान देण्यात आले असल्याने आदिवासी समाजाच्या सेवेसाठी संधी मिळाली आहे.
दरम्यान शिंदे फडणवीस सरकारच्या काळात महिनाभरानंतर विस्तार झाला असून आज आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातून तब्बल पाच आमदारांची मंत्री पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळात उत्तर महाराष्ट्राला झुकते माप दिले आहे. मालेगावचे दादा भुसे, जळगावचे गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, नंदुरबाराचे विजयकुमार गावित यांच्यासह नगरचे राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्री मंडळात स्थान दिले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राला मिळालेल्या पाच मंत्र्यामुळे निश्चितच हा भाग सुजलाम सुफलाम होईल यात शंका नाही.