एक्स्प्लोर

Sharad Pawar Nashik : शरद पवार नाशिकमध्ये दाखल, आज पहिल्यांदा छगन भुजबळांविना स्वागत, कशी आहे सभेची तयारी? 

Sharad Pawar Nashik : शरद पवार (Sharad Pawar) नाशिकमध्ये दाखल झाले असून पहिल्यांदा छगन भुजबळांविना शरद पवार यांचे स्वागत करण्यात आले आहे. 

Sharad Pawar Nashik : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे नाशिकमध्ये (Nashik) दाखल झाले असून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून जंगी स्वागत करण्यात येत आहे. आज येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शरद पवार यांची जाहीर सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर ते आज नाशिकमध्ये दाखल झाले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदा शरद पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा शरद पवार हे नाशिकमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा छगन भुजबळ हे पवारांच्या स्वागताला येत असतात. मात्र आजच्या नाशिक दौऱ्याचे चित्र मात्र वेगळे पाहायला मिळत आहे. 

आज छगन भुजबळांचा (Chhagan Bhujbal) मतदारसंघ असलेल्या येवला (Yeola) शहरात शरद पवारांची पहिली सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकपासून ते येवलापर्यंत ठिकठिकाणी शरद पवार यांचे स्वागत करण्यात येणार आहे. काही वेळापूर्वी शरद पवार यांचे नाशिक शहरात आगमन झाले असून ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचं स्वागत केलं. त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad), खासदार अमोल कोल्हे उपस्थित असून नाशिकमध्ये स्वागत झाल्यानंतर ते येवलाकडे रवाना झाले आहेत. यावेळी शरद पवार समर्थकांकडून स्वागत करण्यात येऊन मोठी घोषणाबाजी देखील करण्यात आली. विशेष म्हणजे पहिल्यांदा छगन भुजबळांच्या अनुपस्थितीत शरद पवार यांचे स्वागत करण्यात आले आहे. 

येवल्यात तगडा पोलीस बंदोबस्त

दरम्यान राष्ट्रवादीचे (Maharashtra NCP) अध्यक्ष शरद पवार यांची आज नाशिकच्या येवल्यात जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी खबरदारीसह कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. एक अप्पर पोलीस अधीक्षक, दोन उपविभागीय अधिकारी, सहा पोलीस निरीक्षक, 15 सहायक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक, 100 पोलीस कर्मचारी, 25 गृहरक्षक दलाच्या जवानांसह तीन शीघ्र कृती दल व दोन राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आले. येवला शहरातील येणारे रस्ते व मध्यवर्ती भागासह सभास्थळी हा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

हजारो नागरिकांची उपस्थिती 

तसेच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी पक्ष बांधणीसाठी कंबर कसली असून ते पहिल्यांदा नाशिक दौऱ्यावर आले आहेत. छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात त्यांची जाहीर सभा होत असून या सभेसाठी शरद पवार समर्थकच नाही तर शिवसेना ठाकरे गट देखील मैदानात उतरला आहे. ठाकरे गटाकडून सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. छगन भुजबळांना शह देण्यासाठी शरद पवारांच्या साथीला ठाकरे गटातील नेते सरसावले आहेत. त्याचबरोबर येवला शहरातील बाजार समिती आवारात ही सभा होणार असून या सभेसाठी जवळपास पाच ते सहा हजार लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार नरेंद्र दराडे यांनी दिली आहे. तसेच नाशिकपासून ते येवलापर्यंत ठिकठिकाणी शरद पवारांचे स्वागत करण्यात येणार असून बॅनरबाजी लक्ष वेधून घेत आहे. 

Sharad Pawar Yeola : शरद पवारांना ठाकरे गटाकडून भक्कम साथ, येवल्यात 2024 ला बदल होणार, आमदार दराडेंचा दावा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 26 February 2025 : ABP Majha : 7 PmABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 February 2025JOB Majha News : केंद्रीय औद्योगित सुरक्ष दलमध्ये नोकरीची संधी,  शैक्षणिक पात्रता काय? 26 Feb 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 26 February 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
Embed widget