Sharad Pawar Yeola : शरद पवारांना ठाकरे गटाकडून भक्कम साथ, येवल्यात 2024 ला बदल होणार, आमदार दराडेंचा दावा
Sharad Pawar Yeola : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या येवला येथील सभेला शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे पाठबळ मिळत आहे.
Sharad Pawar Yeola : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या येवला येथील सभेला शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे पाठबळ मिळत असून शिवेना ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे दोन्ही बंधूनी तयारीसाठी कंबर कसली आहे. शरद पवार यांची सभा दूरगामी परिमाण करणारी ठरणार असून आगामी निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा दराडे यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या (Maharashtra NCP) गटाकडून बंड केल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडालेली आहे. या सगळ्या घडामोडींवर भाष्य करण्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले असून सुरवात नाशिक जिल्ह्यापासून केली आहे. आज छगन भुजबळांचा (Chhagan Bhujbal मतदारसंघ असलेल्या येवला शहरात शरद पवारांची पहिली सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकपासून ते येवलापर्यंत ठिकठिकाणी शरद पवार यांचे स्वागत करण्यात येणार आहे. या सभेसाठी शरद पवार समर्थकच नाही तर शिवसेना ठाकरे गट देखील मैदानात उतरला आहे. ठाकरे गटाकडून सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. छगन भुजबळांना शह देण्यासाठी शरद पवारांच्या साथीला ठाकरे गटातील नेते सरसावले आहेत.
यात शिवसेना आमदार नरेंद्र दराडेसह (Narendra Darade) अपक्ष आमदार किशोर दराडे हे दोघेही सोबत आहेत. येवला सभेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही दराडे बंधूकडून सभेची तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे छगन भुजबळांच्या विरोधातील शरद पवारांच्या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी शिवसेना विधानपरिषदचे आमदार नरेंद्र दराडे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, शरद पवार यांची सभा दूरगामी परिमाण करणारी ठरणार असून आगामी निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा दराडे यांनी केला आहे. मतदारसंघात घोषणा होतात, मात्र कामे होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.
येवल्यात 2024 ला बदल होणार
ते पुढे म्हणाले की, छगन भुजबळ यांना 20 वर्षांपूर्वी येवल्यातील रस्तेही माहिती नव्हते, मी दाखवले. सलग चार निवडणुकीत भुजबळ यांच्याबरोबर होतो. मात्र आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत रहाणारअसून आजच्या सभेला 5 ते 7 हजार नागरिक उपस्थित राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आजची सभा पुढील निवडणुकीवर परिणाम करणारी सभा होणार असून 2024 च्या निवडणुकीत येवल्यात बदल होणार हे निश्चित असल्याचे ते म्हणाले.