Sharad Pawar : 'मिटने वाला मैं नाम नहीं…' शरद पवार यांची भर पावसात ग्रँड एन्ट्री, येवल्यात इतिहास घडणार?
Sharad Pawarछ शरद पवार आज येवला दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे छगन भुजबळही मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या मतदारसंघात जाणार आहेत. तिथं ते मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
LIVE
Background
NCP Political Crisis: राष्ट्रवादीत बंड करुन नाशिकचे आमदार छगन भुजबळांनी भाजप शिवसेनेसोबत घरोबा केला. आणि त्याला उत्तर म्हणून शरद पवार आता बंडखोरांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. पवारांची पहिली सभा छगन भुजबळांच्या येवल्यात होणार आहे.
शरद पवार आज येवला दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे छगन भुजबळही मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या मतदारसंघात जाणार आहेत. तिथं ते मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहेत. पवारांच्या सभेला शह देण्याचा छगन भुजबळ यांच्याकडून प्रयत्न आहे. दरम्यान दुसरीकडे पवारांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर येवल्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. शरद पवारांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर अजित पवार, छगन भुजबळ यांचेही फोटो आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर माणिकराव शिंदे यांचाही फोटो लावण्यात आलाय.. त्यामुळे नेमकं कोण कोणासोबत आहे.. असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलाय आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. वर्षभरापूर्वी ज्या पद्धतीने शिवसेना (Shivsena) फुटून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्याच घटनेची अजित पवारांनी घडवून आणली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत छगन भुजबळ यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. राज्याच्या मंत्री मंडळात कॅबिनेटपदी निवड झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ हे प्रथमच नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहे. शनिवार 8 जुलैला दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्यांचे पाथर्डी फाटा, नाशिक येथे आगमन होणार आहे. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी (Maharashtra NCP) पक्षात मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबईत पार पडलेल्या बैठकीतून अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार टीकाही केली. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे जाहीर करत सुरवात नाशिक जिल्ह्यापासूनच करणार असल्याचे देखील जाहीर केले. त्यानुसार शरद पवार उद्या 8 जुलै रोजी येवला (Yeola) येथील बाजार समिती आवारात जनेतला संबोधित करणार असून येवला म्हणजे भुजबळांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्याच येवल्यात उद्या शरद पवार भुजबळांचा समाचार घेणार आहेत. तर दुसरीकडे या सभेच्या पूर्वी छगन भुजबळ यांचे नाशिक शहरात जंगी स्वागत करण्यात येणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेतलेले छगन भुजबळ उद्या नाशिकमधे येणार असून शरद पवार भुजबळ यांच्या बालेकिल्लात सभा घेत असतानाच छगन भुजबळ शक्ती प्रदर्शन करणार आहेत. दुपारी दोन वाजता नाशिकमधे भव्य स्वागत होणार असून पवारांच्या सभेला शह देण्याचा छगन भुजबळ यांच्याकडून शह देण्याचा प्रयत्न असणार आहे.
NCP Ajit Pawar: शरद पवारांना धक्का; पवारांसोबत कारमधून प्रवास करणारा आमदार अजित पवारांच्या गटात
Sharad Pawar : 'मिटने वाला मैं नाम नहीं…' शरद पवार यांची भर पावसात ग्रँड एन्ट्री, येवल्यात इतिहास घडणार?
Sharad Pawar: भाजपसोबत चर्चा झाल्या होत्या पण निर्णय कधीच झाला नाही : शरद पवार
Sharad Pawar: सत्ता मिळाली नाही म्हणून जर आमचे सहकारी जर सत्तेमध्ये गेले तर हरकत नाही. भाजपसोबत चर्चा झाल्या होत्या पण निर्णय कधीच झाला नाही, चर्चा झाल्या होत्या.