एक्स्प्लोर

नवी मुंबईतल्या शाळेजवळ सापडलेला टाईम बॉम्ब निकामी करताना मोठा स्फोट

नवी मुंबईतल्या कळंबोली येथील सुधागड शाळेच्या बाहेर सापडलेल्या बॉम्बचा सिमेंट बॉक्स बॉम्बशोधक पथकाने स्कॅनिंग मशीन लावून तपासला. परंतु बॉम्ब निकामी करता आला नाही. परिणामी बॉम्बशोधक पथकाने रात्री 2 वाजता तळोजा एमआयडीसीमधील एका निर्जनस्थळी बॉम्ब नेला. तिथे त्याचा मोठा स्फोट झाला.

मुंबई : कळंबोली येथील सुधागड शाळेच्या बाहेर एका हातगाडीवर बॉम्ब ठेवण्यात आला होता. या बॉम्बचा स्फोट होण्याआधीच शाळेच्या दोन शिपायांनी त्याचे टायमर सॉकेट तोडल्याने मोठा अनर्थ टळला. हातगाडीवर ठेवण्यात आलेल्या बॉम्बला टायमर लावण्यात आले होते. त्यावर दुपारी 1 ची वेळ निश्चित(सेट ) करण्यात आली होती. परंतु दुपारी 12.30 वाजता शाळेचे शिपाई गोपाळ कुंभार आणि विश्वकर्म या दोघांनी टायमर बॉम्बपासून वेगळे केले. त्यामुळे या बॉम्बचा स्फोट झाला नाही. कळंबोलीत सुधागड शाळेजवळ काल (सोमवार) टाइम बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली होती. एका लोखंडी पेटीमध्ये सिमेंटचा बॉक्स ठेवण्यात आला होता. त्याला बाहेरून घड्याळ लावून वायरींग करुन टायमर जोडण्यात आले होते. परंतु बॉम्ब आणि टायमरमधील कनेक्शन तोडल्यामुळे त्याचा स्फोट झाला नाही. परिणामी मोठा अनर्थ टळला. टायमर आणि बॉम्बमधील कनेक्शन जरी तोडले असले तरी बॉम्ब निकामी केला नव्हता. त्यामुळे रात्री 8 वाजेपर्यंत बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरु होते. बॉम्ब निकामी करण्यासाठी तळगांव येथील सीआरपीएफच्या बॉम्बशोधक पथक आणि मुंबईच्या पथकांना पाचारण करण्यात आले. बॉम्बशोधक पथकाने स्कॅनिंग मशीन लावून सिमेंटचा बॉक्स तपासला. परंतु बॉम्ब निकामी करता आला नाही. परिणामी बॉम्बशोधक पथकाने रात्री 2 वाजता तळोजा एमआयडीसीमधील एका निर्जनस्थळी बॉम्ब नेला. तिथे त्याचा स्फोट झाला. दरम्यान सिमेंट बॉक्समध्ये कोणत्या प्रकारची स्फोटके ठेवली होती. याबाबतची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. बॉम्बचे अवशेष फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत. एटीएसचे प्रमुख देवेन भारती यांनी घटनास्थळी भेट देवून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे. दरम्यान, शाळेसमोर बॉम्ब ठेवणाऱ्या संशयिताचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane : 'माझे दोन्ही पुत्र कर्तृत्ववान हे माझं भाग्य'; खासदार नारायण राणेंकडून भर सभेत दोन्ही मुलांचे तोंडभरून कौतुक 
'माझे दोन्ही पुत्र कर्तृत्ववान हे माझं भाग्य'; खासदार नारायण राणेंकडून भर सभेत दोन्ही मुलांचे तोंडभरून कौतुक 
Maharashtra News LIVE Updates :  भाजपचं ठरलं, सेना राष्ट्रवादी विधानपरिषदेवर कुणाला संधी देणार?
Maharashtra News LIVE Updates : भाजपचं ठरलं, सेना राष्ट्रवादी विधानपरिषदेवर कुणाला संधी देणार?
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
Beed Crime: बीडमध्ये अंगावर काटा आणणारी घटना, प्रेमसंबंधाच्या संशयावरुन मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाला जीव जाईपर्यंत मारलं, अंगावर काळे-निळे वळ
मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, बीडमध्ये तरुणाला शरीर काळनिळं पडेपर्यंत मारलं, अखेर जीव सोडला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 17 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवानSpecial Report | Pakistan Vs Baloch Liberation Army | पाकचे तुकडे होणार? स्वतंत्र बलुचिस्तान निर्मितीची नांदी?Special Report Politics On Aurangzeb Kabar : औरंगजेबाची कबर, राजकारण जबर; वाद मिटणार की चिघळणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane : 'माझे दोन्ही पुत्र कर्तृत्ववान हे माझं भाग्य'; खासदार नारायण राणेंकडून भर सभेत दोन्ही मुलांचे तोंडभरून कौतुक 
'माझे दोन्ही पुत्र कर्तृत्ववान हे माझं भाग्य'; खासदार नारायण राणेंकडून भर सभेत दोन्ही मुलांचे तोंडभरून कौतुक 
Maharashtra News LIVE Updates :  भाजपचं ठरलं, सेना राष्ट्रवादी विधानपरिषदेवर कुणाला संधी देणार?
Maharashtra News LIVE Updates : भाजपचं ठरलं, सेना राष्ट्रवादी विधानपरिषदेवर कुणाला संधी देणार?
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
Beed Crime: बीडमध्ये अंगावर काटा आणणारी घटना, प्रेमसंबंधाच्या संशयावरुन मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाला जीव जाईपर्यंत मारलं, अंगावर काळे-निळे वळ
मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, बीडमध्ये तरुणाला शरीर काळनिळं पडेपर्यंत मारलं, अखेर जीव सोडला
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिंदे गटाचे काही लोक आले, काही कारण नसताना मारहाण केली,रत्नदीप चव्हाणनं सगळं सांगितलं,अंजली दमानियांचा सेनेच्या आमदाराला इशारा
धाराशिवमधून भूमच्या वाल्हा गावात एकाला मारहाण, सेना आमदाराच्या कार्यकर्त्यांवर आरोप, दमानियांचा नेत्याला इशारा
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
Embed widget