एक्स्प्लोर

Mumbai Covid Scam: सनदी अधिकारी संजीव जैस्वालांच्या अडचणी वाढणार? ईडी छापेमारीत आढळल्या 15 कोटींच्या मुदत ठेवी

Mumbai Covid Scam: आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता.ईडीच्या छापेमारीत जैस्वालांकडे आढळल्या 15 कोटींच्या मुदत ठेवी

Mumbai Covid Scam: आयएएस अधिकारी संजीव जैस्वाल (Sanjiv Jaiswal) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ईडी (ED) अधिकाऱ्यांना जे रोख रकमा आणि मालमत्ता सापडल्या आढळून आल्या आहेत. यापैकी बहुतेक मालमत्ता या संजीव जैस्वाल आणि त्यांच्या पत्नीशी संबंधित आहे. सुत्रांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यामुळे आता आयएएस अधिकारी संजीव जैस्वाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ईडीनं बुधवारी मुंबईत 15 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली. कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीकडून करण्यात आलेल्या छापेमारीत काही रोख रकमा आणि मालमत्तांसंदर्भातील कागदपत्र ईडीच्या हाती लागली आहेत. जैस्वाल यांच्या पत्नीकडे मढ आयलँड अर्धा एकर भूखंड आणि 34 कोटी रुपयांचे अनेक फ्लॅट्स अशा सुमारे 24 मालमत्ता आहेत आणि 15 कोटींच्या एफडी आहेत. एका आयएस अधिकाऱ्याकडे एवढी संपत्ती आली कुठून? याचासुद्धा तपास ईडीकडून केला जाणार आहे, माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.

कोविड घोटाळा प्रकरणी ईडीकडून संजीव जयस्वाल यांच्या घरी छापेमारी करण्यात आली होती. त्याचबरोबर त्यांना गुरुवारी चौकशीसाठीसुद्धा बोलवण्यात आलं होतं. मात्र काही महत्त्वाच्या कामांत असल्यामुळे संजीव जैस्वाल चौकशीसाठी हजर राहू शकले नाहीत.  

दरम्यान,  21 जून रोजी कोविड घोटाळ्याच्या प्रकरणात विविध ठिकाणी छापेमारी करून शोध घेण्यात आला आणि 68.65 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 50 हून अधिक स्थावर मालमत्ता अंदाजे बाजार मूल्य 150 कोटींहून अधिक उघड करणारी कागदपत्रं, 15 कोटींच्या एफडी असलेली कागदपत्रं, 2.46 कोटी रुपयांचे दागिने, मोबाईल फोन आणि लॅपटॉप इत्यादी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत.

कथित कोविड सेंटर घोटाळ्याशी संजीव जैस्वाल यांचा संबंध काय?

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस हॉस्पिटलच्या टेंडर बोलीच्या वेळी संजीव जैस्वाल अतिरिक्त महापालिका आयुक्त होते आणि महत्त्वाचं म्हणजे स्थापन करण्यात आलेल्या समितीचा भाग होते. ज्यांनी लाईफलाईन हॉस्पिटलला मॅनेजमेन्ट सर्व्हिसेस कंपनीला टेंडर दिलं. 

टेंडर प्रक्रियेवेळी ज्या कंपनीला हे कंत्राट द्यायचं आहे, त्या कंपनीकडे पूर्वीचा अनुभव आणि पात्रता याचा विचार करून एक कंत्राट देणं क्रमप्राप्त होतं. मात्र तपासात या कंपनीला पुरेसा अनुभव नसताना शिवाय या कंपनीकडे रुग्णसेवेसाठी पुरेशी मनुष्यबळ आणि साहित्य उपलब्ध नसतानासुद्धा या कंपनीला कंत्राट देण्यात आलं. 

आता संजीव जैस्वाल यांनी असं असतानासुद्धा या कंपनीला कंत्राट का दिलं? याची ईडीकडून कसून चौकशी करत आहे. संजीव जैस्वाल यांच्याशी काही इतर महानगर पालिका अधिकारी यांच्या घरीसुद्धा छापेमारी करण्यात आली आहे. जैस्वाल व्यतिरिक्त, ईडीनं महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार आणि बीएमसीचे वैद्यकीय अधिकारी यांच्यावरही छापे टाकले आहेत. जे केंद्रीय खरेदी विभागात होते, ज्यांनी रुग्णालयांना ऑक्सिजन आणि इतर साहित्य पुरवठ्यासाठी समन्वय अधिकारी होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Deshmukh Nagpur : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक; 4 जणांवर गुन्हा दाखलTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  11 AM :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaParinay Phuke on Anil Deshmukh : निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देशमुखांनी कुभांड रचलं - परिणय फुकेABP Majha Headlines :  9 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
Embed widget