एक्स्प्लोर

Raakh Marathi Movie: सत्य आणि अन्यायाच्या संघर्षात कोण जिंकेल? ‘राख’ चा जबरदस्त ट्रेलर लाँच!

Raakh Marathi Movie: राख वेब सिरीज 21 मार्चला अल्ट्रा झकासवर येणार असून, आज 17 मार्चला सोशल मीडियावर ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

Raakh Marathi Movie: मराठी ओटीटी (Marathi Movie) विश्वात दमदार आणि प्रभावी कथा घेऊन येण्याचा अल्ट्रा झकासचा प्रयत्न सुरूच आहे. आता त्यांनी आणखी एक रोमांचक वेब सिरीज सादर करण्याची तयारी केली आहे, 'राख'. ही वेब सिरीज केवळ गुन्हेगारी आणि पोलिस तपासावर आधारित नसून, सत्याच्या शोधात एका पोलीस अधिकाऱ्याच्या प्रवासाची आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर पडणाऱ्या परिणामांची एक उत्कंठावर्धक कथा आहे. तसेच, ही वेब सिरीज 21 मार्चला अल्ट्रा झकासवर येणार असून, आज 17 मार्चला सोशल मीडियावर ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

अत्याधुनिक कथा, दमदार सादरीकरण

सामाजिक अन्याय, राजकीय कटकारस्थानं आणि पोलिस दलातील संघर्ष यासारख्या विषयांवर आधारित 'राख' ही वेब सिरीज 7 भागांमध्ये प्रेक्षकांसमोर सादर केली जाणार आहे. एका निडर पोलिस अधिकाऱ्याची सत्याच्या शोधात चाललेली धडपड, त्याला मिळणारे खरे-खोटे संकेत, आणि या संपूर्ण प्रवासात त्याच्याच भोवती विळखा घालणारी एक अंधारी आणि धक्कादायक दुनिया - हे सगळं अनुभवायला मिळणार आहे. प्रत्येक भाग नवीन रहस्य उलगडत जाईल आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.

दिग्दर्शक आणि कलाकारांची जबरदस्त जोडी

या वेब सिरीजचं दिग्दर्शन अनुभवी दिग्दर्शक राजू देसाई आणि विशाल देसाई यांनी केलं असून, त्यांच्या दिग्दर्शनशैलीत वास्तववाद, सस्पेन्स आणि थरार याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोबतच निर्मितीची जबाबदारी सुशीलकुमार अग्रवाल यांनी देखील समर्थपणे सांभाळली आहे, ज्यांनी अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंटच्या माध्यमातून अनेक दर्जेदार प्रकल्प साकारले आहेत.

कलाकारांचा तगडा संचही ‘राख’ चं मोठं आकर्षण आहे. यात अजिंक्य राऊत, गौरी नलावडे, रोहित कोकाटे, मिलिंद शिंदे, मिलिंद दस्ताने, चैतन्य देशपांडे, ऋतुराज शिंदे, नेहा बाम, विनायक चव्हाण आणि कृष्ण रघुवंशी यांसारखे ताकदीचे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे ही वेब सिरीज आणखी उत्कंठावर्धक ठरणार आहे.

थरारक कथा, उत्कंठा वाढवणारा अनुभव

'राख' ही केवळ एक गुन्हेगारी कथा नाही, तर ती सत्य आणि न्यायासाठी झगडणाऱ्या माणसाची कहाणी आहे.  इन्स्पेक्टर अभय अरविंद जाधव हा एक निडर आणि प्रामाणिक पोलिस अधिकारी दाखवला आहे, जो कोणत्याही दबावाला झुकत नाही. परंतु, जेव्हा त्याच्या जवळच्या मित्राचा खून होतो, तेव्हा त्याची न्याय मिळवून देण्याची लढाई आणखी तीव्र होते. या गुन्ह्यामागे मोठे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट होत जाते, आणि सत्याच्या शोधात अभयला मोठ्या राजकीय व गुन्हेगारी शक्तींशी सामना करावा लागतो. कायदा सर्वांसाठी सारखाच आहे का? भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या निडर माणसाचं आयुष्य किती कठीण असतं? आणि, खरंच न्याय मिळतो का?

अल्ट्रा झकास - सस्पेन्स, क्राईम आणि थरारप्रेमींसाठी परफेक्ट हब

अल्ट्रा झकास मराठी प्रेक्षकांसाठी नेहमीच काहीतरी नवीन आणि वेगळं आणण्याचा प्रयत्न करत असतं. विशेषतः पोलिस तपासणी, गुन्हेगारी आणि भ्रष्ट व्यवस्था यावर आधारित कथा सादर करण्याच्या बाबतीत अल्ट्रा झकास एक परिपूर्ण प्लॅटफॉर्म ठरत आहे. 'राख' ही त्याच दिशेने एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे.

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, "मराठी प्रेक्षकांसाठी आम्ही नेहमीच दर्जेदार आणि वेगळ्या धाटणीचं मनोरंजन आणण्याचा प्रयत्न करतो."राख'सारखी वेब सिरीज फक्त एक कथा नाही, तर सस्पेन्स, थरार आणि रोमांचक प्रवासाने भरलेला अनुभव आहे. यासोबत, आम्ही मराठी चित्रपट आणि वेब सिरीजच्या माध्यमातून मनोरंजनासह सामाजिक भान जपण्याचा देखील प्रयत्न करत असतो आणि आमचं उद्दिष्ट नेहमीच प्रेक्षकांना दर्जेदार आणि कुटुंबासोबत पाहण्याजोगं मनोरंजन देण्याचे आहे."

कुठे पाहाल?

मराठी सिनेप्रेमी आणि वेब सिरीजप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे. 'राख' 21  मार्चपासून फक्त अल्ट्रा झकास या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. गुन्हेगारी जगताचा अंधार उलगडणारी, निडर पोलीस अधिकाऱ्याच्या संघर्षाची आणि सत्याच्या शोधातील एका जबरदस्त प्रवासाची ही कथा पाहायला विसरू नका.

पाहा ट्रेलर : 

महत्त्वाच्या बातम्या

Tejaswini Kolhapure On IVF Struggles: प्रचंड त्रास, 1000 हून जास्त इंजेक्शन्स, शरीराचा आकारच बदलून गेलेला...; श्रद्धा कपूरची बहीण 'टेस्ट ट्यूब बेबी', आईनं IVF च्या असंख्य वेदना सहन करुन दिलेला जन्म
प्रचंड त्रास, 1000 हून जास्त इंजेक्शन्स, शरीराचा आकारच बदलून गेलेला...; श्रद्धा कपूरची बहीण 'टेस्ट ट्यूब बेबी', आईनं IVF च्या असंख्य वेदना सहन करुन दिलेला जन्म
Bollywood Music Director Struggle Life: बॉलिवूडचा 'तो' दिग्गज संगीत दिग्दर्शक, जो किशोर कुमारांना म्हणायचा 'शोर कुमार', तर लतादीदींचाही केलेला अपमान, वादग्रस्त स्वभावामुळे मृत्यूनंतरही सर्वांनी फिरवेली पाठ
बॉलिवूडचा 'तो' दिग्गज संगीत दिग्दर्शक, जो किशोर कुमारांना म्हणायचा 'शोर कुमार', तर लतादीदींचाही केलेला अपमान, वादग्रस्त स्वभावामुळे मृत्यूनंतरही सर्वांनी फिरवेली पाठ
5 मराठी चित्रपटांचे होणार वर्ल्ड प्रीमिअर! अमेरिकेतील NAFA फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमाची जागतिक भरारी
5 मराठी चित्रपटांचे होणार वर्ल्ड प्रीमिअर! अमेरिकेतील NAFA फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमाची जागतिक भरारी
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget