Numerology: वाईट कर्मांचे फळ ज्यांना निश्चितच मिळते! 'या' जन्मतारखेच्या व्यक्तींची पाठ शनिदेव सोडत नाही, अंकशास्त्रात म्हटलंय...
Numerology: अंकशास्त्रानुसार, काही जन्मतारखेचे लोक कर्माच्या परिणामापासून कधीही सुटू शकत नाहीत. त्यांना शनीच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो.

Numerology: जैसे त्याचे कर्म, त्याचे फळ देतो रे ईश्वर...! हिंदू धर्मात कर्माला विशेष महत्त्व आहे. जे लोक सतत भांडणं, अनावश्यक क्रोध आणि लोकांचा आदर न करणे यासारखे वाईट कृत्य करतात, त्यांना शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. अंकशास्त्रानुसार जाणून घेऊया त्या जन्मतारखेबद्दल, ज्या दिवशी जन्मलेल्या व्यक्तीला त्याच्या वाईट कर्मांचे फळ निश्चितच मिळते.
'या' लोकांना शनीच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो
असे म्हटले जाते की, एखाद्याच्या कर्माचे फळ निश्चितच मिळते. चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर शिक्षा निश्चितच मिळते. शनिदेवाला त्यांच्या कर्माचे फळ देण्यासाठी त्रिमूर्तीने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. कर्माचा दाता शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो, असाही शास्त्रात उल्लेख आहे. प्रत्येक राशीच्या आणि प्रत्येक अंकाच्या लोकांना त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच मिळते. अंकशास्त्र अशा काही जन्मतारखांबद्दल सांगते, ज्या दिवशी जन्मलेले लोक त्यांच्या कर्माच्या परिणामापासून कधीही सुटू शकत नाहीत. त्यांना शनीच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. त्या तारखांबद्दल जाणून घ्या..
शनीचा कोणत्या लोकांशी विशेष संबंध आहे?
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 4, 8, 9, 10, 13, 17, 18, 19, 22, 26, 27, 28 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या लोकांना त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच मिळते. या तारखांचा कर्मफळ देणाऱ्या शनिशी सखोल संबंध आहे, ज्यामुळे ते त्यांच्या कर्मापासून दूर पळू शकत नाहीत. शास्त्रात 8 क्रमांक हा शनिचा अंक मानला जातो. त्यामुळे ज्या लोकांची जन्मतारीख 8 आहे त्यांनी कधीही वाईट कर्म करू नये. अन्यथा ते आयुष्यभर त्रस्त राहतात.
View this post on Instagram
शनीच्या अशुभ प्रभावाचे संकेत
ज्या लोकांवर शनीचा अशुभ प्रभाव पडतो अशा लोकांना अशक्तपणा, पोटदुखी आणि त्वचेशी संबंधित आजार होतात. याशिवाय कॅन्सरचा धोकाही वाढतो.
शनीच्या अशुभ प्रभावामुळे केस गळतात आणि माणसाला काही वेळात टक्कल पडते.
ज्या लोकांच्या कुंडलीत शनि ग्रहाची स्थिती कमकुवत असते, त्यांच्या घरात सतत दुःखाचे वातावरण असते.
हेही वाचा>>
Moon Transit 2025: आज रंगपंचमीची दुपार महत्त्वाची, 'या' 3 राशींचे सोन्याचे दिवस येणार! चंद्राचे संक्रमण मिळवून देणार बक्कळ पैसा, नोकरीत पगारवाढ?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















