भावाच्या पिक्चरचा टीझर अन् नवऱ्यानं दिलेलं संगीत; कोकण हार्टेड गर्लचा आनंद गगनात मावेना, सूरजला म्हणाली...
Ankita Walawalkar Post For Suraj Chavan: 'झापुक झुपूक' सिनेमात सूरज चव्हाणचा जीवनप्रवास त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय हिरोची मुख्य भूमिका सिनेमात सूरज स्वत: साकारणार आहे.

Ankita Walawalkar Post For Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) विनर सूरज चव्हाण (Suraj Chavhan) सध्या भलताच चर्चेत आहे. कारणही तसंच आहे, सूरचा पहिला वहिला सिनेमा 'झापुक झुपूक'चा टीझर (Zhapuk Zhapuk Teaser) रिलीज झाला असून लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या टीझरवर प्रेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत सूरज चव्हाण दिसतोय, तर चित्रपटातील सर्वच्या सर्व डायलॉग्स सूरजच्याच स्टाईलमध्ये आहेत. एकंदरीतच टीझर पाहून संपूर्ण चित्रपट 'झापुक झुपूक' स्टाईल असल्याचं लक्षात येतंय. दरम्यान, बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विनर जाहीर झाल्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच, त्या सिनेमाचं नाव 'झापुक झुपूक' (Zhapuk Zhapuk Movie) असेल असंही जाहीर केलं होतं.
'झापुक झुपूक' सिनेमात सूरज चव्हाणचा जीवनप्रवास त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय हिरोची मुख्य भूमिका सिनेमात सूरज स्वत: साकारणार आहे. सूरजचे चाहते या सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. 'झापुक झुपूक'चा टीझर रिलीज होताच, कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरनंही यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टची देखील सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात अंकिता आणि सूरज स्पर्धक होते. बिग बॉसच्या घरात 100 दिवसांचा प्रवास एकत्र करता करता अनेक नाती जुळतात. सूरज आणि अंकितामध्येही मेत्रीच्या नात्यासोबतच भावा-बहिणीचं नातं जुळलं होतं. अंकिता सूरजला भाऊ मानायची. अशातच आपल्या भावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच अंकितानं खास इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. पण, त्यासोबतच कोकण हार्टेड गर्लचं या सिनेमासोबत खास कनेक्शनही आहे. ते म्हणजे, सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमासाठी अंकिताचा नवरा कुणाल भगतनं संगीत दिलं आहे. 'झापुक झुपूक' सिनेमाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अंकिता वालावलकरचा नवरा कुणाल भगत आणि त्याचा पार्टनर किरण दोघे मिळून सांभाळत आहेत.

भावाच्या पिक्चरचा टीझर आणि त्याला नवऱ्यानं दिलेलं संगीत यामुळे अंकिताच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. याचसंदर्भात तिनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. "कडक ना भावा…मार्केट गाजव अख्ख्यांना नाचव", असं म्हणत अंकितानं सूरजचं कौतुक केलं आहे. तर, "गुलीगत म्युझिक रे नवऱ्या", असं म्हणत अंकितानं दोघांचंही कौतुक केलं आहे.
दरम्यान, केदार शिंदे, कुणाल-करण, सना शिंदे आणि संपूर्ण 'झापुक झुपूक' टीमला अंकितानं या पोस्टमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शित 'झापुक झुपूक' हा सिनेमा येत्या 25 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रातील सिनेमागृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























