Exclusive : मुलांच्या लसीकरणाबाबत पडलेल्या प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर; जाणून घ्या चाईल्ड टास्क फोर्सच्या सदस्यांकडून
Vaccine for children : मुलांचं लसीकरण सुरु तरी कधी होणार? लस घेतल्याशिवाय त्यांना शाळेत तरी कसं पाठवायचं? असे अनेक प्रश्न पालकांना पडले असतील. या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केलाय.
Vaccine for children : मुलांचं लसीकरण सुरु तरी कधी होणार? लस घेतल्याशिवाय त्यांना शाळेत तरी कसं पाठवायचं? असे अनेक प्रश्न राज्यातल्याच नव्हे तर देशभरातल्या पालकांना पडले होते. पण ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरु होणार आहे. पंतप्रधान मोदींनीच याची घोषणा केली आहे. मात्र मुलांना किती डोस दिले जाणार? दोन डोसमधलं अंतर किती असलं पाहिजे? कोमॉर्बिडिटी असलेल्या मुलांना लस द्यायची की नाही द्यायची अशा नव्या प्रश्नांनी जन्म घेतला आहे. याच प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी चाईल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. समीर दलवाई यांच्याशी एबीपी माझानं एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला आहे.
प्रश्न- शाळा बंद करण्याचा टास्क फोर्सचा विचार आहे?
डॉ. समीर दलवाई- राज्यात ओमायक्रोन आणि कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्याचा टास्क फोर्सचा विचार नाही. दहावी बारावी परीक्षेच्या दृष्टिकोणातून लसीकरणसाठी 15 ते 18 वयोगटाचा टप्पा महत्वाचा आहे. ओमायक्रोन किंवा कोरोना रुग्णांची वाढ यामुळे सध्या तरी शाळा बंद करण्याचा निर्णय नाही. पुढे चित्र बदललं तर मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील, पण सध्या शाळा बंद करण्याबाबत विचार नाही
प्रश्न- लहान मुलांच्या लसीकरणाची प्रक्रिया कशी असेल?
डॉ. समीर दलवाई- ज्याप्रमाणे आपण कोवॅक्सिन लस प्रौढांना दिली अगदी तशीच लस ही 15 ते 18वयोगटातील मुलांना दिली जाणार आहे. पहिला डोस आणि त्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल.
प्रश्न- लहान मुलांच्या लसीकरणाची आवश्यकता का आहे?
डॉ. समीर दलवाई- 15 ते 18 असा वयोगट आहे. ज्यांची दहावी बारावी परीक्षा जवळ आहे. त्यामुळे त्याच्या जवळपास लसीकरण होणे महत्वाचे आहे. हा वयोगट जास्त बाहेर जाणारा आहे. अमेरिकेत किंवा युरोपमध्ये ज्या प्रकारे कोरोनाने थैमान घातले आहे अजून परिस्थिती भारतात नाही, त्याच कारण म्हणजे भारत मोठ्या प्रमाणावर झालेलं लसीकरण हेच आहे. आता जेंव्हा लहान मुलांचा लसीकरण सुरू होईल तेंव्हा भारत पूर्ण प्रोटेक्शनकडे जाण्याची शक्यता वाढते.
प्रश्न- गंभीर आजार असणाऱ्या मुलांचं काय?
डॉ. समीर दलवाई- अति धोका असलेल्या मुलांना ज्यांना हृदयविकास, कॅन्सर सारखे आजार आहे. त्यांना लसीकरणाची जास्त गरज आहे, डॉक्टरांना विचारून अशा मुलांनी लस घ्यावी. ओमायक्रोन जरी झाला तरी लहान मुलांना त्याचे सौम्य लक्षण दिसतील, गंभीर स्वरूपाचे लक्षण फारसे दिसणार नाही.
प्रश्न- लसीकरणाची तयारी किंवा त्याचे नियोजन कसे करणार?
डॉ. समीर दलवाई- लसीकरणाची प्रणाली तयारी त्याचे नियोजन ऑलरेडी सगळं रेडी आहे. आता जशा लशी उपलब्ध होतील तसा लसीकरण वेगाने होईल.
प्रश्न- या लसीकरणाला प्रतिसाद मिळेल का?
डॉ. समीर दलवाई- या वयोगटातील मुले लसीकरणाला चांगला प्रतिसाद देतील, कारण त्यांच्या आई वडिलांनीही लस घेतली आहे..
प्रश्न- नोझल लसीकरणाबद्दल काय सांगाल?
डॉ. समीर दलवाई- नोझल व्हॅक्सीनचा फरक एवढाच आहे की ज्याला सुई टिकविण्याची भीती आहे त्याला नाकातून लस देऊ.
प्रश्न- काय आवाहन कराल?
डॉ. समीर दलवाई-लसीकरण सुरू झाल्यानंतर मुलांनो लस घ्या ! घाबरू नका ! पण मास्क घाला नियम पाळत राहा ! कोरोना गेलेला नाही.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्वाच्या बातम्या