FSSAI : एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
Online Food Delievery : ज्यांचे शेल्फ लाइफ म्हणजेच एक्सपायरी डेट किमान 45 दिवस आहे असेच खाद्यपदार्थ ऑनलाईन डिलिव्हरी कराव्या अशी सूचना FSSAI ने ऑनलाइन काम करणाऱ्या फूड बिझनेस ऑपरेटरना दिली आहे.
FSSAI Guidelines To Online Food Delievery Company : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने ऑनलाइन काम करणाऱ्या फूड बिझनेस ऑपरेटरना (FBOs) काही सूचना दिल्या आहेत. FSSAI ने म्हटले आहे की फूड बिझनेस ऑपरेटर्सनी फक्त तेच खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवावेत ज्यांचे शेल्फ लाइफ म्हणजेच एक्सपायरी डेट किमान 45 दिवस आहे. जर एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर त्याची डिलिव्हरी करू नका असं म्हटलं आहे. खाद्य व्यवसाय करणाऱ्यांनी लेबलिंग आणि डिस्प्ले नियमांचे पालन करावे असंही याशिवाय फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) म्हटलं आहे.
ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर करत असाल तर ऑर्डर केलेले अन्न खाण्यासाठी योग्य आहे हे तपासले पाहिजे. जर त्या खाद्यपदार्थाची एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर ती स्वीकारू नका. तसेच त्या बाबतची तक्रार भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडे (FSSAI) नोंदवू शकता.
आकडेवारीवरून असे दिसून येते की, सध्या देशभरात ग्राहक न्यायालयांमध्ये यासंबंधी दरवर्षी 5 लाखांहून अधिक तक्रारी दाखल केल्या जातात. परंतु यातील अनेक प्रकरणे विविध कारणांमुळे प्रलंबित राहत असल्याचं चित्र आहे.
ई-जागृती पोर्टलद्वारे प्रकरणे निकाली काढणं सोपं
ई-जागृती पोर्टलमुळे ग्राहक न्यायालयांसमोर असलेली प्रकरणे निकाली काढणे सोपे होणार असून त्यामुळे ग्राहक त्यांच्या हक्कांबाबत सजग होतील. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने ऑनलाइन काम करणाऱ्या फूड बिझनेस ऑपरेटर्सना (FBOs) फक्त तेच खाद्यपदार्थ वितरीत करण्यास सांगितले आहे ज्यांची शेल्फ लाइफ म्हणजेच एक्सपायरी डेट किमान 45 दिवस आहे.
ही बातमी वाचा:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )