एक्स्प्लोर

Zero Hour : महायुतीच्या Sudhir Mungantiwar आणि Chhagan Bhujbal यांचे नाराजीचे सूर; आता पुढे काय?

Zero Hour : महायुतीच्या Sudhir Mungantiwar आणि Chhagan Bhujbal यांचे नाराजीचे सूर; आता पुढे काय?
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालीय, हे तुम्ही सर्व जाणता. वास्तविक अधिवेशन म्हटलं की विरोधकांची प्रश्न, टीका आणि आरोप हे सारं होतं. त्यावर सरकारकडून उत्तरं देण्यात येतात आणि बचाव करण्यात येतो. पण आजचा दिवस ना विरोधकांनी गाजवला, ना सरकारनं. तो गाजला सत्ताधारी महायुतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांमुळे...  प्रचंड बहुमतानं निवडून आलेल्या महायुती सरकारमध्ये भुजबळांना मंत्रिपद नाकारण्यात आलं, त्यावर त्यांनी अगदी उघड नाराजी व्यक्त केली. होय, मी नाराज आहे. मंत्रिपदं आली आणि गेली पण भुजबळ संपला नाही या शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. आणि त्याच वेळी भुजबळांनी आणखी एक सूचक वक्तव्य केलं.   मंत्रिपद नाकारल्याबद्दल मी अजित पवारांशी चर्चा केली नाही, मला त्याची गरज वाटली नाही असंही ते म्हणाले. हे नाट्य इथंच संपलं नाही मंडळी. पत्रकारांशी बोलल्यावर भुजबळ तडकाफडकी नाशिकला रवाना झाले. मला समता परिषदेच्या सदस्यांशी चर्चा करायची आहे, असं म्हणत अधिवेशन सोडून भुजबळ नाशिककडे निघाले. तिथं ते उद्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत, तर बुधवारी ते समर्थकांचा मेळावा घेण्याची शक्यता आहे.   भुजबळांना मंत्रिपद नाकारण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पहिलं संभाव्य कारण मराठा आरक्षणाशी निगडित आहे. तर दुसरं संभाव्य कारण म्हणजे अजित पवार आणि भुजबळांमधील मतभेदांची शक्यता किंवा राष्ट्रवादी काँग्रेसनं वरिष्ठ नेत्यांना एक प्रकारे निवृत्ती देण्याचं ठरवलं असण्याची शक्यता आहे.  मंडळी, इतकंच नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणं भाजपमध्येही नाराजी आहे. कारण राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. एबीपी माझाला त्यांनी exclusive प्रतिक्रिया दिली. त्यात ते भुजबळांप्रमाणं, मी नाराज आहे, असं उघडपणे म्हणाले नाहीत, पण अप्रत्यक्षपणे त्यांनी तसे संकेत दिले. सुधीर मुनगंटीवारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन, त्यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली.  

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget