PM Modi about Vaccine for children : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तीन मोठ्या घोषणा, बूस्टर डोसबाबतही महत्त्वाची माहिती
PM Narendra Modi Live : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशाला संबोधित करताना तीन महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या आहेत.
PM Narendra Modi Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाला संबोधित करताना लसीकरण आणि बूस्टर डोस (Booster Dose) संबधी महत्त्वाची घोषणा केली. यावेळी त्यांनी 18 वर्षांखालील नागरिकांच्या लसीकरणासह (Vaccination) बूस्टर डोस संबधी देखील माहिती दिली. तसंच सध्या सुरु असलेल्या सणांच्या काळातही काळजी घेणं महत्त्वाचं असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.
नेमक्या तीन घोषणा काय?
पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या देशाला संबोधित करताना तीन मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये सर्वात पहिली घोषणा म्हणजे 15 ते 18 वयोगटातील (15 to 18 Age Vaccination) मुलांचं लसीकरण सुरु करणार असल्याची मोठी घोषणा केली. हे लसीकरण नव्या वर्षात 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यामुळे शाळांमध्ये अखेरच्या वर्षात तसंच कनिष्ट महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं.
त्यानंतर दुसरी महत्त्वाची घोषणा म्हणजे बूस्टर डोसबाबत मोदींनी केली. ती म्हणजे आरोग्य कर्मचारी (Health Workers) अर्थात हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सना (Frontline Workers) दोन लसीकरणांनंतर बूस्टर डोसही देण्याची सुरुवात करण्यात येणार असल्याचं मोदीनी सांगितलं. याची सुरुवात 10 जानेवारी, 2021 पासून होणार आहे. त्यानंतर तिसरी घोषणा म्हणजे 60 वर्षांवरील सामान्य नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस देण्याची सुरुवात करणार असल्याचं यावेळीन मोदींनी सांगितलं.
अजूनही काळजी घेणं महत्त्वाचं
कोरोनाच्या संकटाबाबत बोलताना पंतप्रधानांनी भारत या संकटाचा सामना मोठ्या शिताफीने करत असल्याचं सांगतिलं. आतापर्यंत 141 कोटी जनतेचं लसीकरण झालं असून आपली अर्थव्यवस्थाही उस्ताहजनक आहे. दरम्यान लसीकरण कोरोनाविरुद्ध एक मोठं शस्त्र असल्याचंही ते म्हणाले. तसंच ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, कोरोना अजूनही गेला नसल्याने काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- PM Modi Speech Highlight : 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण 3 जानेवारी सुरू : पंतप्रधान मोदी
- ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकार सतर्क, महाराष्ट्रासह दहा राज्यांत विशेष पथकं पाठवणार
- अहमदनगर जिल्ह्यात नो वॅक्सिन नो एन्ट्री! ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha