एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 

Chhagan Bhujbal : ज्या ज्या वेळी छगन भुजबळ अडचणीत आले आहेत त्या त्या वेळी त्यांनी समता परिषतेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपली पुढची दिशा ठरवली आहे. 

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही, म्हणजे मंत्रपदाची खुर्ची मिळाली नाही. भुजबळांसह त्यांच्या समर्थकांसाठी हा जबर धक्का होता. भुजबळांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडेही पाठ फिरवली आणि हिवाळी अधिवेशन सोडून नाशिकचा रस्ता धरला. ओबीसींचा आवाज मानला जाणाऱ्या भुजबळांवर ही वेळ का आली? असे प्रसंग अनेकदा अनुभवलेल्या भुजबळांसाठी इथून पुढची वाट कशी असेल? समता परिषदेच्या माध्यमातून आपलं काम सुरुच ठेवतील का? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.

भुजबळांना मंत्रिपद नाकारल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. कुठे टायरची जाळपोळ, कुठे रास्तारोको तर कुठे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोरच आंदोलन असं चित्र नाशिक आणि येवला तालुक्यात दिसत होतं.

मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही? 

छगन भुजबळ म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेले शिवसैनिक. बाळासाहेब असताना शरद पवारांमुळे जोखीम घेत शिवसेना फोडून काँग्रेसमध्ये गेलेले नेते. छगन भुजबळ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनेपासून शरद पवारांसोबत राहणारे ज्येष्ठ नेते.  राष्ट्रवादीत फूट पडल्यावर शरद पवारांना सोडून अजितदादांसोबत राहणारा जुना चेहरा म्हणजे छगन भुजबळ. छगन भुजबळ म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील ओबीसी समाजाचा आताच्या घडीचा सर्वात मोठा चेहरा. असं सगळं असताना मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही हा प्रश्न भुजबळांनाही सतावतोय.

मराठा आरक्षणाचा आगडोंब उसळला असताना मनोज जरांगेंना थेट अंगावर घेणारे हेच भुजबळ होते. एवढं करूनही मंत्रिमंडळातून डावल्याची सल भुजबळांच्या मनात आहे. भुजबळांचे महाविकास आघाडीतील जुने सहकारी आणि आता विरोधी पक्षात असलेले नेते या असंतोषाचा भडका कसा उडेल यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. 

भुजबळांविरोधात अनेक गोष्टी होत्या. लोकसभा लढण्यासाठी नाशिकमधून दावेदारी करणे, त्यातून शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या मनात तयार झालेला संशय. तसंच विधानसभा निवडणुकीत नांदगांवमधून शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात पुतण्या समीर भुजबळ यांना बळ देत युतीत मिठाचा खडा टाकणे. या त्यातल्या दोन दोन गोष्टी असू शकतात. 

अजित पवार कशी समजूत काढणार?

आजवर जेव्हा जेव्हा भुजबळ अडचणीत आलेत किंवा मोठी लढाई लढण्याची त्यांनी तयारी केली तेव्हा तेव्हा समता परिषद आणि भुजबळ समर्थक मैदानात उतरले आहेत. आताही ते समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी आणि येवल्यातील जनतेशी संवाद साधून पुढील निर्णय घेतील असं सांगितलं जातंय. आणखी एका बंडाच्या तयारीत असणाऱ्या छगन भुजबळ यांची समजूत अजित पवार कशी काढणार हे पाहावं लागणार आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Damania : एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Gautam Gambhir : प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
Jasprit Bumrah Player of the Series : फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Laxman Hake On Manoj Jarange : जरांगे घुसायची भाषा आम्हाला सांगू नको, नाही तर..Manoj Jarange News : तुमचा खून झाल्यावर आम्ही मोर्चा काढणार नाही का? धनंजय मुंडेंना घडवून आणायचंय?Manoj Jarange Pune : जर धनंजय मुंडेचं पोट भरलं नसेल तर..आता आमचा नाईलाज आहे..-जरांगेAjit Pawar Bowling Baramati : क्रिकेटच्या मैदानात दादांची कमाल! दादांची बॉलिंग पाहून सगळे थक्क

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Damania : एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Gautam Gambhir : प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
Jasprit Bumrah Player of the Series : फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
Nashik Crime News : नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
Anjali Damania : बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
Santosh Deshmukh Case : मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
Video : माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
Embed widget