Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 20 मे 2022 : शुक्रवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार
गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर स्थगित झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. मात्र, पुण्यातील सभा होणार असून मनसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज यांनी ट्वीटमध्ये केले आहे. प्रकृतीच्या कारणामुळे 5 जूनला होणारा अयोध्या दौरा (Ayodhya Tour) पुढे ढकलला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती.
2. संभाजीराजेंनी शिवसेनेचा उमेदवार म्हणून राज्यसभा निवडणूक लढवावी, उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती, संभाजीराजे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढण्यास तयार
Sambhaji Raje meets cm Uddhav Thackeray : संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री आणि संभाजीराजे या दोघांमध्ये जवळपास 35 मिनिटं चर्चा झाली. या भेटीत राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात चर्चा झाल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या या प्रस्तावात सुधारणा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. माझी उमेदवारी शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करावी, असा प्रस्ताव संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्याची माहिती मिळत आहे. संभाजीराजे यांच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचार करुन कळवतो असे सांगितलं आहे.
3. राज्यात लवकरच सात हजार पदाची भरती प्रक्रिया, पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी भरती होणार असल्याची सूत्रांची माहिती
4. कांद्याचे भाव पुन्हा गडगडले, प्रतिकिलो 1 ते 5 रुपये दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल, वाढती आवक आणि उष्णतेचा फटका
5. मान्सून उद्यापर्यंत अरबी समुद्रात दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज, कोकण, मराठवाड्यासह, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 20 मे 2022 : शुक्रवार
6. इंदू मिलमध्ये उभारणार बाबासाहेबांचा साडेतीनशे फुटी पुतळा, गाझियाबादमध्ये काम सुरू, राज्याच्या उपसमितीकडून प्रतिकृतीची पाहणी
7. ज्ञानवापीप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाकडे नजरा, मशिद कमिटीच्या याचिकेवर महत्त्वाची सुनावणी, दुसऱ्या अहवालात मंदिराचे प्रतीक आढळल्याचा उल्लेख असल्याची सूत्रांची माहिती
8. चंद्रपुरात पेट्रोल टँकर आणि ट्रकची भीषण धडक, सहा जणांचा मृत्यू, धडकेनंतर लागलेल्या आगीत 6 जण होरपळल्याची माहिती
9. पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 9 जणांचा बुडून मृत्यू, भाटघर धरणात 5 तर खेडमध्ये चौघे बुडाले
10. निखत झरीनला जागतिक बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक, थायलंडच्या प्रतिस्पर्ध्यावर 5-0 ने मात, निखत झरीन सुवर्णपदक मिळवणारी पाचवी भारतीय महिला