एक्स्प्लोर

Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीच्या मोठ्या हालचाली, वाल्मिक कराडला मकोका लागणार?

Beed crime news: वाल्मिक कराडांसोबतची जवळीक भोवली, एपीआय महेश विघ्नेंसह दोघांना SIT पथकातून बाहेरचा रस्ता. वाल्मिक कराडला मोक्का लागण्याची दाट शक्यता.

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र  संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सीआयडीने सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांच्यासह इतरही आरोपींवर या आधी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील अनेक गुन्हे या आरोपींनी एकत्रितपणे कट रचुन केल्याचे दिसून येत असल्याने सीआयडीकडून या टोळीवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तसे घडल्यास वाल्मिक कराडच्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे संतोष देशमुख हत्याप्रकरणात पुढे काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

मकोका कायदा लागल्यास काय कारवाई होते?

या कायद्यानुसार सुपारी देणे, खून, खंडणी, अमली पदार्थाची तस्करी, हप्ता, खंडणीसाठी अपहरण असे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मकोका लावला जातो. गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलीसांकडून प्रथम समज दिली जाते. पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॅार्डवर येतो. आरोपीवर अटकेची तसच नंतर तडीपारीचीही कारवाई होते. अशा आरोपींना अटक केली जाते. तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलीसांना मोक्का अंतर्गत कारावाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. 

मोक्का लागल्यावर काय शिक्षा मिळते ?

मोक्का लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही. भारतीय दंड विदान संहीतेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच सिक्षा मोक्काच्या कलम 3 (1) नुसार देता येईल. ही सिक्षा किमान 5 वर्षे ते जन्मठेपेपर्यंत राहते. त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखांपर्यांतचा असतो. तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद या कायद्यात आहे. संघटीत गुन्हेगारी करुन जर आर्थिक फायदा घेतला जात असेल कींवा टोळी तयार करुन जर गुन्हेगरी करत असाल तर त्या संदर्भात मोक्काची तरतूद केली आहे.

वाल्मिक कराडांसोबतची जवळीक भोवली, एपीआय महेश विघ्नेंसह दोघांना SIT पथकातून बाहेरचा रस्ता

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी गठित करण्यात आलेल्या विशेष तपास पथकातील (एसआयटी) पोलीस अधिकाऱ्यांचे आरोपी वाल्मिक कराड याच्याशी लागेबांधे असल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार एसआयटी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विघ्ने  आणि  मनोज वाघ SIT टीममधून बाहेरच रस्ता दाखवण्यात आहे. पोलीस अधिकारी महेश विघ्ने यांचा वाल्मिक कराड याच्यासोबतचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वाल्मिक कराड यांच्याशीच लागेबांधे असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना एसआयटी पथकात स्थान दिल्यामुळे  विरोधकांनी रान उठवले होते. 

आणखी वाचा

वाल्मिक कराडने मसल पॉवरसोबत माईंड पॉवरही वापरली, 100 बँक अकाऊंट सापडली, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Embed widget