एक्स्प्लोर

चीनमधील HMPV व्हायरसच्या बातमीनं काळजात धडकी भरली, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; लक्षणं कशी ओळखावी?

HMPV Virus Guidlines : एचएमपीव्ही या व्हायरसच्या चीन देशातील उद्रेकानंतर खबरदारीचा उपाय म्हणून  राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच आरोग्य मंडळातील उपसंचालकांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

HMPV Virus in China : जगभरात कोरोनाची (Corona Virus) लाट आली आणि सारं होत्याचं नव्हतं झालं. कोरोनाचा प्रसार चीनमधून (China) झाला होता. अख्ख्या जगानं चीनमुळे कोरोनासारख्या महामारीला तोंड दिलं. तेव्हापासूनच कायम चीनकडे संपूर्ण जगाच्या नजरा खिळलेल्या असतात. अशातच आता चीनमध्ये एक नवा व्हायरल धुमाकूळ घालत असल्याची माहिती मिळत आहे. चीनमध्ये  HMPV Virus नं डोकं वर काढलं असून या आजाराची साथच चीनमध्ये पसरल्याची माहिती अनेक माध्यमांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देश अलर्ट मोडवर आहेत. 

एचएमपीव्ही या व्हायरसच्या चीन देशातील उद्रेकानंतर खबरदारीचा उपाय म्हणून  राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच आरोग्य मंडळातील उपसंचालकांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच, घाबरण्याची गरज नाही त्यामुळे भिती पसरवू नका, असा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच, ही मार्गदर्शक तत्त्व फक्त आणि फक्त दक्षता बाळगण्यासाठी असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 

चीनमधून आलेला नवा व्हायरस Human Metapneumovirus (HMPV) बाबत तसं पाहायला गेलं तर, चिंतेचं कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भितीचं वातावरण निर्माण करण्याची गरज नाही, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे . या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करुन सर्दी-खोकला अर्थात आयएलआय/सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात यावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.  

सार्वजनिक आरोग्य विभागानं राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचं विश्लेषण केलं आहे. 2023 च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. दरम्यान, खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये? या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.

काय करावं?

  • खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा. 
  • साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत.
  • ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
  • भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
  • संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.

काय करणं टाळावं? 

  • खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं. यामुळे संसर्ग लगेच पसरतो. 
  • टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं. 
  • आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये. शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावं.  
  • डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये. 

लक्षणं काय? 

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) हा एक व्हायरस आहे, ज्याची लक्षणं सामान्य सर्दीच्या लक्षणांसारखीच असतात. सामान्य प्रकरणांमध्ये, यामुळे खोकला किंवा घरघर, वाहणारं नाक किंवा घसा खवखवणं होतो. लहान मुलं आणि वृद्धांमध्ये, एचएमपीव्ही संसर्ग गंभीर असू शकतो. या व्हायरसमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या लोकांमध्ये गंभीर लक्षणं दिसू शकतात. 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas on Walmik Karad : 100 बँक खाती, 17 सीम कार्डचा वापर, खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका! वाल्मिक कराडची सुरेश धसांकडून पुन्हा पोलखोल
100 बँक खाती, 17 सीम कार्डचा वापर, खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका! वाल्मिक कराडची सुरेश धसांकडून पुन्हा पोलखोल
Walmik Karad: संतोष देशमुख प्रकरणातील एसआयटीचे प्रमुख वगळता बाकी सदस्य वाल्मिक कराडचे पोलीस; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
वाल्मिक कराडचा खास माणूस एसआयटी पथकात; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Ind vs Eng T20 Series : टीम इंडिया होणार मोठी उलथापालथ! इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी BCCI 'या' खेळाडूंना देणार संधी? जाणून घ्या शेड्यूल अन् सर्वकाही
टीम इंडिया होणार मोठी उलथापालथ! इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी BCCI 'या' खेळाडूंना देणार संधी? जाणून घ्या शेड्यूल अन् सर्वकाही
Mumbai High Court : मुलीला एकदा फॉलो करणे गुन्हा नाही; सतत पाठलाग करणे हा कायदेशीर गुन्हा! उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा केली कमी
मुलीला एकदा फॉलो करणे गुन्हा नाही; सतत पाठलाग करणे हा कायदेशीर गुन्हा! उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा केली कमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 80 at 08AM Superfast 06 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 06 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 730AM 06 January 2025 माझा गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 06 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas on Walmik Karad : 100 बँक खाती, 17 सीम कार्डचा वापर, खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका! वाल्मिक कराडची सुरेश धसांकडून पुन्हा पोलखोल
100 बँक खाती, 17 सीम कार्डचा वापर, खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका! वाल्मिक कराडची सुरेश धसांकडून पुन्हा पोलखोल
Walmik Karad: संतोष देशमुख प्रकरणातील एसआयटीचे प्रमुख वगळता बाकी सदस्य वाल्मिक कराडचे पोलीस; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
वाल्मिक कराडचा खास माणूस एसआयटी पथकात; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Ind vs Eng T20 Series : टीम इंडिया होणार मोठी उलथापालथ! इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी BCCI 'या' खेळाडूंना देणार संधी? जाणून घ्या शेड्यूल अन् सर्वकाही
टीम इंडिया होणार मोठी उलथापालथ! इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी BCCI 'या' खेळाडूंना देणार संधी? जाणून घ्या शेड्यूल अन् सर्वकाही
Mumbai High Court : मुलीला एकदा फॉलो करणे गुन्हा नाही; सतत पाठलाग करणे हा कायदेशीर गुन्हा! उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा केली कमी
मुलीला एकदा फॉलो करणे गुन्हा नाही; सतत पाठलाग करणे हा कायदेशीर गुन्हा! उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा केली कमी
Ladki Bahin Yojana: खटाखट नोंदणी वाढवण्यासाठी भाजपचा नवीन फंडा, 2100 रुपये देतो सांगून पक्ष सदस्यत्त्वाचे फॉर्म फरुन घेतले
लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देतो सांगून भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष सदस्यत्त्वाचे फॉर्म भरुन घेतले
Pushpa 2 Box Office: 'पुष्पा 2'नं किती कोटींचा गल्ला जमवला? 800 की, 1200 कोटी? बॉक्स ऑफिसच्या आकड्यांचं गूढ तुम्हाला उलगडलं?
'पुष्पा 2'नं किती कोटींचा गल्ला जमवला? 800 की, 1200 कोटी? बॉक्स ऑफिसच्या आकड्यांचं गूढ तुम्हाला उलगडलं?
Suresh Dhas On Walmik Karad Dhananjay Munde: वाल्मिक कराडची सटकली अन्...; धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडची सटकली अन्...; धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
एसटी घोटाळ्यात चौकशीचा ससेमिरा; कागदपत्रे सादर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश 
एसटी घोटाळ्यात चौकशीचा ससेमिरा; कागदपत्रे सादर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश 
Embed widget