Beed News: मनोज जरांगेंना तडीपार करा! धनंजय मुंडेंच्या समर्थकांचा गुणरत्न सदावर्तेंना व्हिडीओ कॉल
बीड पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पहाटे 3 वाजता मनोज जरांगेंवर अदखलपात्र गुन्हा बीड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
Beed News: राज्यात संतोष देशमुख प्रकरणानंतर धनंजय मुंडेवर परभणीतील मोर्चात वादग्रस्त केल्यानंतर परळीत रविवारी मोठा गदारोळ उडाला. मनोज जरांगे,अंजली दमानिया, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी बीड मधील ओबीसी समाजबांधव तसेच मुंडे समर्थक हे रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून बसले होते. या ठिय्या आंदोलनात त्यांच्याबरोबर महिला देखील सामील झाल्या. अखेर पहाटे 3 वाजता मनोज जरांगे यांच्यावर अदकलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, मुंडे समर्थकांनी जरांगेना तडीपार करण्याची मागणी करत गुणरत्न सदावर्तेंना (Gunaratna Sadavarte) व्हिडीओ कॉल केला.
परभणीत धनंजय मुंडेच्या समर्थकांनी गुणरत्न सदावर्तेंना व्हिडीओ कॉल करत जरांगे जर इतक्या खालच्या भाषेत बोलत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. जरांगेंना तडीपार करावे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत बीड पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पहाटे 3 वाजता मनोज जरांगेंवर अदखलपात्र गुन्हा बीड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. (Manoj Jarange)
मुंडे समर्थक आक्रमक
धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी टीका केल्यानंतर परळीत पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांमध्ये ठिय्या करत जोरदार घोषणाबाजी करत जरांगेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मुंडे समर्थकांनी जरांगेंच्या टीकेवरून पोलिस ठाण्याबाहेर जरांगेंना तडीपार करण्याची मागणी केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी आणि देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी शनिवारी परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला होता. त्याचबरोबर जर देशमुख कुटुंबीयांना त्रास झाला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही दिला होता.
मुंडे समर्थक आक्रमक, जरांगेंवर सलग दुसरा गुन्हा दाखल
धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर मुंडे समर्थकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला गेला. याच्या निषेधार्थ रविवारी सकाळपासून परळी पोलिस ठाण्यासमोर शेकडोच्या संख्येने मुंडे समर्थक जमा झाले आणि घोषणाबाजी केली. मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्याविरोधात गुन्हा नोंद करावा अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर मनोज जरांगे यांच्याविरोधात पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
हेही वाचा: