Shivsena : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून हालचाली, लोकसभेत पराभूत झालेल्या चार खासदाराची नावं चर्चेत
राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यसभेच्या निवडणुका जूनमध्ये होणार आहेत त्यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे.
मुंबई : शिवसेनेनं राज्यसभेची सहावी जागा लढवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चार माजी खासदाराची नावं चर्चेत आहे. चंद्रकांत खैरे, शिवाजी आढळराव पाटील, अनंत गीते आणि आनंदराव अडसूळ यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या चारही नेते गेल्या लोकसभेत पराभूत झाले आहेत, त्यामुळं एकाला राज्यसभेवर संधी देण्याचा शिवसेनेचा विचार आहे. दरम्यान, अपक्ष म्हणून राज्यसभेच्या रिंगणात उतरलेले छत्रपती संभाजीराजे यांच्या समोरच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. तर संभाजीराजे काहीवेळीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत. त्यामुळं पुढे काय घडमोड घडते? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यसभेच्या निवडणुका जूनमध्ये होणार आहेत त्यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यात राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीनुसार भाजपचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी होईल. तर, सहाव्या जागेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे आहे त्यात शिवसेनेनं आधीच सहाव्या जागेवर दावा केला आहे. दुसरीकडे भाजपही सहाव्या जागेसाठी उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे भाजपनं जर हा उमेदवार रिंगणात उतरवला तर फोडाफोडीचं राजकारण पाहयला मिळू शकतं. त्यामुळं सहाव्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच आणि राजकारण पाहायला मिळू शकतं.
सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार होते. शिवसेनेचे आमदार रमेश लटकेचं निधन झाल्यानं ती संख्या 168 आहे. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष पाच आमदार असे एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 168 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो.
संबंधित बातम्या :