सकाळी १० च्या100 हेडलाईन्स- Top Headlines at 10AM 06 January 2025 Top 100 at 10AM Superfast
सकाळी १० च्या100 हेडलाईन्स- Top Headlines at 10AM 06 January 2025 Top 100 at 10AM Superfast
बीड हत्या प्रकरणासंदर्भात आज आज सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटणार,जितेंद्र आव्हाड, वड्डेटीवार, ज्योती मेटे, सुरेश धस, नरेंद्र पाटील, संदीप क्षीरसागर उपस्थित राहणार.
संतोष देशमुख हत्याप्रकरणातले सुदर्शन घुलेसह दोन आरोपी जागेच्या शोधात भिवंडीपर्यंत, हॉटेलमध्ये मागितला आश्रय, पण हॉटेल मालकाचा नकार
पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकी मिळत असल्याचा अंजली दमानियांचा आरोप, दिवसाला ७०० ते ८०० फोन कॉल येत असल्याचं दमानियांचं वक्तव्य
अंजली दमानियांना सुरक्षा देण्याची सुप्रिया सुळेंची मागणी,माझी सुरक्षा काढून घेतली तरी चालेल, पण दमानियांना सुरक्षा द्या, सुळेंचं वक्तव्य.
मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सवाल, पैसे घेतल्याशिवाय माझ्या गाडीतही डिझेल भरु नका, अजितदादांची तुफान फटकेबाजी.
सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशीच्या न्यायासाठी धाराशिवमध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन, ११ जानेवारीला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
मनोज जरांगेंनी परभणी येथे धनंजय मुंडे यांच्याविरोधात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी जरांगेंच्या विरोधात परळी आणि बीडमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल,