(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Accident News : गाड्यांचा वेग घेतोय जीव! कर्वेनगरमध्ये भरधाव दुचाकीने महिलेला उडवलं, अपघाताचं थरारक CCTV फुटेज समोर
पुण्यात मागील काही दिवसांपासून अपघाताचं सत्र सुरुच आहे. अशाच एका भीषण अपघाताचं थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. पुणे शहरात कर्वेनगर परिसर आणि उपनगरामध्ये अल्पवयीन मुलांकडून बेफाम पद्धतीने गाड्या चालवल्या जातात.
Pune Accident News : पुण्यात मागील काही दिवसांपासून अपघाताचं सत्र सुरुच आहे. असाच एक भीषण अपघाताचं थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. पुणे शहरात कर्वेनगर परिसर आणि उपनगरामध्ये अल्पवयीन मुलांकडून बेफाम पद्धतीने गाड्या चालवल्या जातात. हा बेफामपणा महिलेच्या जीवावर बेतला असून महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रंजना प्रकाश वसवे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांकडून तरुणावर कारवाई करण्यात आली.
16 मे रोजी हा अपघात झाला होता. त्यानंतर महिलेला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांनी महिलेला डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र त्यानंतर घरात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अपघातामुळे बेफाम गाडी चालवणाऱ्यांवर आता कारवाई करण्यात येत आहे.
हिंगणे होम कॉलनीमध्ये बेफामपणे वाहन चालविणाऱ्या, सायलेन्सर आणि कर्णकर्कश हॉर्न मधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशी करत आहेत. कर्वेनगर येथील हिंगणे होम कॉलनीत सध्या अनेक तरुण बेफामपणे गाड्या चालवत आहेत, जोरजोरात कर्कश हॉर्न वाजवत आहेत. या सगळ्याचा परिसरातील नागरिकांना भयंकर त्रास होत आहे, याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यासोबतच बेफाम वाहन चालकांवर त्वरित कारवाई करणे फार गरजेचं असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
पायी चालणाऱ्यांची डोकेदुखी वाढली...
पुण्यातील कर्वे रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. शिवाय या रस्त्यावर अनेक जड वाहनंदेखील असतात. त्यामुळे अनेकदा या रस्त्यावर वाहतूक कोंडीदेखील होते. तरुणांच्या भरधाव वेगात असलेल्या गाड्यांमुळे पायी चालणाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. संध्याकाळी अनेक ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडतात मात्र याच नागरिकांना या तरुणांचा त्रास होत आहे.
भरधाव वेगाने गाडी चालकांवर कारवाई...
पुण्यात अनेक परिसरात बेफाम गाड्या चालवत असणाऱ्या तरुणांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे त्यांनी मनमानी थांबवण्यासाठी नागरिकांकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र त्यांच्या या मनामानीमुळे अनेक नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या सगळ्या तरुणांवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्याप्रमाणे या बेफाम वाहन चालकांवर सीसीटीव्ही तपासून पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
संंबंधित बातमी-