(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Prakash Ambedkar : सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये विलिन होण्याची शिंदे गटासमोर अट? प्रकाश आंबेडकरांचं सूचक ट्वीट
Prakash Ambedkar Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातल्या राजकीय उलथापालथीवर प्रकाश आंबेडकरांनी सूचक ट्वीट केलं आहे.
Prakash Ambedkar Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातल्या राजकीय उलथापालथीवर प्रकाश आंबेडकरांनी सूचक ट्वीट केलं आहे. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये विलिनीकरण होण्याची अट शिंदे गटासमोर ठेवलीय का असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा होऊ लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे? असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे ?
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 23, 2022
क्या यह सच है कि बीजेपी ने एकनाथ शिंदे पर शर्त रखी है कि बीजेपी में विलय हो जाए तभी सरकार बनेगी ?
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 23, 2022
प्रकाश आंबेडकर काय बोलतात याचा भाजपशी काही संबंध नाही- अतुल भातखळकर
यावर बोलताना भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, प्रकाश आंबेडकर काय बोलतात याचा भाजपशी काही संबंध नाही. याआधीही त्यांनी अशी अनेकदा चित्रविचित्र वक्तव्य केलेली आहेत. शिवसेनेत सध्या जे काही सुरु आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्याशी भाजपचा काही संबंध नाही, असंही भातखळकर म्हणाले. भाजपची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी, कामासाठी संघर्ष करत राहू. हे सरकार अंतर्विरोधानं भरलेलं सरकार आहे. तिन्ही पक्ष एकमेकांशी भांडतात, हे राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत स्पष्ट झालं आहे, असंही भातखळकर म्हणाले.
एकनाथ शिंदेंना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव- सूत्र
शिवसेनेत सर्वात मोठं बंड करून ठाकरे सरकारला हादरा दिल्यानंतर आता भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांचं एकत्र सरकार स्थापन करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. एकनाथ शिंदेंना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. भाजपला आता एकनाथ शिंदे यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. भाजपच्या प्रस्तावावर एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतल्यानंतर पुढच्या घडामोडी घडतील.
इतर महत्वाच्या बातम्या
राजकीय संकट घोंघावतंय...SID कडून सरकारला दोन महिन्यांपूर्वीच बंडखोरीची कल्पना