एक्स्प्लोर

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची तयारी मागील 6 महिन्यांपासून, गृहखात्याकडून मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्यानंतरही दुर्लक्ष : सूत्र 

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाच ते सहा वेळा गृहखात्याकडून शिंदे यांच्या भाजप नेत्यांशी वाढत्या भेटींबाबत आणि संशयास्पद हालचालींची माहिती देण्यात आली होती

Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करण्याची तयारी मागील 6 महिन्यांपासून सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाच ते सहा वेळा गृहखात्याकडून शिंदे यांच्या भाजप नेत्यांशी वाढत्या भेटींबाबत आणि संशयास्पद हालचालींची माहिती देण्यात आली होती, अशी देखील माहिती आहे. इंटेलिजन्सचां रिपोर्ट मिळून देखील मुख्यमंत्र्यांकडून दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून 'एबीपी माझा'ला मिळाली आहे. 

काल अशी देखील माहिती समोर आली होती की,  एकनाथ शिंदेंच्या बंडाळी प्रकरणी शरद पवार Intelligence Department वर नाराज आहेत. पोलिसांना याबाबत कुणकुणही लागली नाही, याबाबत पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती काल समोर आली होती. 

राज्य गुप्तचर विभागानेही दिली होती माहिती

काल अशी देखील माहिती समोर आली होती की, राज्य गुप्तचर विभागाने अर्थात एसआयडीने महाराष्ट्रातील राजकीय संकटाची कल्पना दोन महिन्यांपूर्वीच सरकारला दिली होती. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावा महाराष्ट्र पोलिसांच्या सूत्रांनी केला होता. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह आठ ते दहा आमदार विरोधी पक्षाच्या संपर्कात होते, अशी गोपनीय माहिती एसआयडीच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वीच दिली होती. 

राज्यातील संभाव्य घडामोडींवर लक्ष ठेवणे, राजकीय घडामोडी आणि हालचाली, गुन्हे तसेच समाजकंटक, दहशतवादी आणि माओवादी कारवायाबद्दल आगाऊ सूचना देणे हे एसआयडीचं काम आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी राज्य गुप्तचर विभागाची स्थापना केली. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार राजकीय घडामोडींची माहिती अनेकदा सरकारला तोंडी दिली जाते. परंतु एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा अंदाज घेण्यात शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकार अयशस्वी ठरलं आहे.

एसआयडीने देखील एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची पूर्वकल्पना दिली होती. अशा परिस्थितीत एसआयडीच्या मदतीने काहीतरी पावलं उचलायला हवी होती. अनेक वेळा राजकारण्यांचे विशेष सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त केलेल्या पोलीस अधिकार्‍यांकडून राज्य पोलिसांना गुप्तचर माहिती देखील मिळते, असं सूत्रांनी सांगितलं.

इतर महत्वाच्या बातम्या

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्र्यांची भावनिक साद, शिंदे मात्र ठाम; राज्यात सत्ता पेच, दोन दिवसांत काय-काय घडलं?

राजकीय संकट घोंघावतंय...SID कडून सरकारला दोन महिन्यांपूर्वीच बंडखोरीची कल्पना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
Bollywood Actress :
"त्याने मला मध्यरात्री 3 वाजता बोलावलं..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; म्हणाली,"मी रात्रभर रडत होते"
Bollywood Movies Updates : 30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Shalini Thackeray On Nirupan : महाराष्ट्रद्रोही, भ्रष्टाचाऱ्यांसाठी मनसेचा पाठिंबा गृहित धरू नयेEknath Shinde On MVA : महाविकास आघाडी नाही तर महाबिघाडी, एकनाथ शिंदेंची टीकाVare Nivadnukiche SuperFast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या, वारे निवडणुकीचे 23 April 2024Vinod tawde Full PC : विनोद तावडे यांची पत्रकार परिषद एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
Bollywood Actress :
"त्याने मला मध्यरात्री 3 वाजता बोलावलं..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; म्हणाली,"मी रात्रभर रडत होते"
Bollywood Movies Updates : 30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
Vinod Tawde : मोदींना मत दिलं तर लोकांना काय मिळालं? भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले
मोदींना मत दिलं तर लोकांना काय मिळालं? भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले
Bachchu Kadu : बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
Shah Rukh Khan with Suhana Khan : शाहरुख खान पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत, लेक सुहानासोबत करणार दोन हात; लेकीच्या करिअरसाठी किंग खान सरसावला
शाहरुख खान पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत, लेक सुहानासोबत करणार दोन हात; लेकीच्या करिअरसाठी किंग खान सरसावला
Bachchu Kadu Amravati : पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडा
पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडा
Embed widget