एक्स्प्लोर

Maharashtra Zilla Parishad Elections 2021 LIVE : जिल्हा परिषद, पंचायत समिती पोट निवडणुकीची रणधुमाळी, लाईव्ह अपडेट

Maharashtra ZP Panchayat Samiti By-elections : कोरोनासंकट आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्रातील 6 जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे.

LIVE

Key Events
maharashtra zilla parishad elections 2021 live updates maharashtra by elections for 85 zp seats and 144 panchayat samiti seats today Maharashtra Zilla Parishad Elections 2021 LIVE : जिल्हा परिषद, पंचायत समिती पोट निवडणुकीची रणधुमाळी, लाईव्ह अपडेट
(File Photo)

Background

08:59 AM (IST)  •  05 Oct 2021

नंदुरबार जिल्ह्यात मतदानासाठी मतदारांचा उत्साह

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात मतदानासाठी मतदार बाहेर पडत आहेत, मात्र वर्षोनुवर्षे मूलभूत सुविधा मिळत नसल्याने समस्या कायम आहे, कोळदा मतदान केंद्रा बाहेरच पाण्याचा हापसा आहे, एकीकडे मतदानासाठी रांगा आणि दुसरीकडे पाण्यासाठी रांगा असं दृश्य बघ्यायला मिळतंय. गेल्या 15 दिवसांपासून हा हापासही बंद असल्याने दूरवर पायपीट करावी लागत होती, निवडणूक असल्यानं दोन तीन दिवसांपूर्वी हापसा सुरू झाल्याची माहिती स्थानिक महिला देत आहेत. दर पंचवार्षिकला निवडणूक होते, मात्र समस्या दूर होत नसल्याची ग्रामस्थांची खंत आहे, तरी देखील लोकशाही वरचा विश्वास कमी नाही, आधी घरचे पाणी भरायचे आणि नंतर मतदानाचा हक्क बजावायचा असा निर्धार या ग्रामस्थांनी केलाय, जेवढी निष्ठा या नागरिकांची आपल्या कर्तव्याबाबत आहे. 
07:44 AM (IST)  •  05 Oct 2021

अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी संपुर्ण तयारी

अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासनाची यासाठी संपुर्ण तयारी झाली आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी ही पोटनिवडणूक होताये. 6 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.  अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी मतदान होत आहेय. तर पंचायत समितीच्या 28 जागांसाठी मतदान होत आहे. आज सातही तालुक्यातून पोलींग पार्टीज मतदान केंद्रावर रवाना झाल्या आहेत. अकोला जिल्हा परिषदेवर सध्या वंचित बहुजन आघाडीची सभा आहेय. अपात्र 14 पैकी 8 सदस्य वंचितचे आहेय. या परिस्थितीत आपली सत्ता राखण्यासाठी वंचित बहुजन आघाडी संघर्ष करतांना दिसतेय. अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी वंचित, भाजप, प्रहार आणि काँग्रेस स्वबळावर लढतेय. तर शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी करून लढतेय. जिल्हा परिषदसाठी 68 तर पंचायत समितीसाठी 119 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेय. जिल्हा प्रशासन संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झालंय. 

07:44 AM (IST)  •  05 Oct 2021

वाशिम जि.प. च्या 14 आणि पं.स.च्या 27 जागांसाठी आज मतदान!

वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 व पंचायत समितीच्या 27 गणांसाठी  पोट निवडणुकी साठी मतदान होत आहे. वाशीम जिल्हा  प्रशासन  सज्ज झालं आहे. सगळ्या मतदान केंद्रावर  जाण्यासाठी कर्मचारी मत यंत्र आणि इतर साहित्य घेऊन  कर्मचारी रवाना होत आहेतय  मात्र कोरोनाचा धोका  लक्षात घेता सगळ्या कर्मचाऱ्याच्या  RTPCR टेस्ट केल्या  जात आहे   वाशिम जिल्हा परिषदेचे 52 गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या 104 गणांसाठी 7 जानेवारी 2020 रोजी निवडणूक झाली होती. ओबीसी प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेचे 14 गट आणि पंचायत समित्यांच्या 27 जागेसाठी 5 ऑक्टोंबर  रोजी पोटनिवडणूक होत आहे. जि.प.च्या 14 गटांसाठी 82 तर पंचायत समितीच्या 27 गणांत एकूण 135 उमेदवारांमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत.  

07:43 AM (IST)  •  05 Oct 2021

पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणूक

पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुक प्रचाराच्या तोफा काल पासून थंडावल्या उद्या जिल्हा परिषदेच्या 15 तर पंचायत समित्यांच्या 14 जागांसाठी मतदान होणार आहे . ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने या जागा रद्द झाल्या असून याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी ला बसलेला पाहायला मिळाला . राष्ट्रवादी च्या 15 पैकी 7 जागा रद्द झाल्या असून शिवसेना 3 , भाजप 4 तर माकपची एक जागा रद्द झाली होती . जिल्हा परिषदेत सध्या महाविकास आघाडी सत्तेत असून शिवसेने कडे अध्यक्ष तर राष्ट्रवादी कडे उपाध्यक्ष पद आहे . जिल्हा परिषदेत एकूण 57 जागा असून बहुमतासाठी 29 जागांची गरज आहे. या पोटनिवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाच्या जागा कमी जास्त झाले तरी जिल्हा परिषदेतील सत्तेत फरक पडणार नसला तरी महाविकास आघाडीत फूट पडल्यास येथे सत्ता बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे . मागे झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेकडे 18 , राष्ट्रवादी काँग्रेस 15 , भाजपक 10 , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 6 , बहुजन विकास आघाडी 4 अपक्ष 3 तर काँग्रेसला एका जागेवर विजय मिळवण्यात यश आलं होतं . मात्र सध्याच्या पोटनिवडणुकीत बहुतांशी जागांवर सेना भाजप आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.   या पोटनिवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे ती शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांची! खासदारांच्या हट्टापायी जिल्हा परिषदेच्या डहाणू तालुक्यातील वणई गटाचा शिवसेनेचा सिटिंग उमेदवार डावलून खासदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित यांना उमेदवारी दिली आहे,,त्यामूळे या गटातील शिवसैनिकां मध्ये नाराजीचा सुर आहे.तर भापज,सेना,राष्ट्रवादी,काँग्रेस अशी अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे जर का खासदार गावित यांच्या चिरंजीवाला येथे चुकून पराभव स्वीकारावा लागला तर त्याचे परिणाम थेट खासदार गावित यांच्या पुढील कारकीर्दीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

07:43 AM (IST)  •  05 Oct 2021

धुळे पोटनिवडणूक, 14 गटांसाठी 42 तर 28 गणांसाठी 72 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

धुळे जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली असून कर्मचाऱ्यांना शहरातील केंद्रीय विद्यालय या जवळील धान्य गोडाऊन येथे साहित्याचे वाटप करण्यात आले, धुळे जिल्हा परिषदेच्या 14 गट आणि 28 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडत असून मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेऊन नियोजन करण्यात आले आहे, धुळे जिल्हा परिषदेच्या 14 गटांसाठी 42 तर 28 गणांसाठी 72 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदानाच्या तयारीचा आढावा घेतला आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Jalgaon Crime : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal Majha Vision : सावरकर ते औरंजेबाची कबर...हर्षवर्धन सपकाळांची स्फोटक मुलाखतDevendra Fadnavis Majha Vision Full : बेधडक उत्तरं, तुफान फटकबाजी! दवेंद्र फडणवीस भरभरुन बोलले..Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिल्यास...Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिला, तर...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Jalgaon Crime : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
Vijay Wadettiwar & Yogesh Kadam : महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
Imtiaz Jaleel Majha Vision : औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांकडून प्रश्नांची सरबत्ती
औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांकडून प्रश्नांची सरबत्ती
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Embed widget