Shiv Sena : 'ठाकरे गट ऑन राईट ट्रॅक! सभेची परवानगी नाकारल्याबाबत सुषमा अंधारे अॅक्शन मोडमध्ये, म्हणाल्या...
Sushma Andhare vs Gulabrao Patil : सुषमा अंधारे एबीपी माझाशी बोलताना विरोधकांवर देखील ताशेरे ओढले आहेत.
Sushma Andhare vs Gulabrao Patil : महाप्रबोधन यात्रेची जळगाव मुक्ताईनगर येथे होणाऱ्या सभेवरून जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलंय. जळगावमध्ये (Jalgaon) होणारी शिवसेनेच्या (Shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आता सुषमा अंधारे चांगल्याच आक्रमक होताना दिसत आहेत. महाप्रबोधन यात्रेचा विरोधकांनी धसका घेतल्यामुळे कुणाचीही तक्रार नसतानाही माझ्या सभेला परवानगी नाकारली गेली, त्यामुळे शिवसेना ठाकरे गट ऑन राईट ट्रॅक असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. जळगावात होणाऱ्या सभेला परवानगी नाकारल्याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचं सुषमा अंधारे एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील ताशेरे ओढले आहेत. काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
गुलाबराव पाटलांवर गंभीर आरोप
सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या, माझ्या सभेला परवानगी का नाकारण्यात आली? याचे काही कारण मला सांगण्यात आले नाही. तसेच माझ्या विरोधात कुठलाही तक्रार अर्ज जळगाव पोलीस स्टेशनमध्ये नाही. तसेच माझ्यावर कुठलीही FIR देखील दाखल नाही. त्यामुळे कुठलाही तक्रार अर्ज आलेला नसताना, तसेच कोणतेही अटक वॉरंट नसताना निव्वळ सत्तेचा गैरवापर करत गुलाबराव पाटील यांच्या आदेशावरून पोलीस कर्मचाऱ्यांनी मला ओलीस ठेवलं गेलं. मला कळत नाही नेमका आक्षेप कोणता आहे? असा गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी गुलाबराव पाटलांवर केला आहे.
याच तीन महिन्याच्या बाळाची गुलाबरावांना भीती का वाटते? -सुषमा अंधारे
माझ्या 7 सभेमध्ये एकही असंसदीय किंवा असंवैधानिक शब्द नव्हता, तसेच सभेत चुकूनही कोणत्याही व्यक्तीचा एकेरी उल्लेख केला नव्हता, मी कुठल्याही जाती-धर्माचा, समाजाचा उल्लेख केलेला नाही. तरी देखील गुलाबराव पाटलांच्या आदेशानुसार मला ओलीस ठेवण्यात आलं. याचं एकमेव कारण म्हणजे त्यांनी महाप्रबोधन यात्रेचा धसका घेतला. आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. एकीकडे ते म्हणतात, सुषमा अंधारे तीन महिन्याचं बाळ आहे. तर याच बाळाची गुलाबरावांना भीती का वाटते? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
माझा आक्षेप देवेंद्र फडणवीसांवर - अंधारे
अंधारे पुढे म्हणाल्या, सध्या सत्तेचा गैरवापर सुरू असून माझ्या विरोधात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मला ओलीस ठेवलं जातंय. आमचा घाव विरोधकांच्या वर्मी लागलाय. माझा आक्षेप देवेंद्र फडणवीसांवर आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या. "गुलाबराव पाटील गृहमंत्रालयाच्या आशीर्वादाशिवाय हे सगळं करणार नाही. तसेच देवेंद्र फडणवीसांना या सगळ्या प्रकाराची कल्पना नसेल का? तुम्ही चिथावणीखोर भाषणं करता. प्रकाश सुर्वे हातपाय तोडायची भाषा करतात, संजय गायकवाड चुन चुन के मारेंगे म्हणतात, नारायण राणे एकेरीने भाष्य करतात, संतोष बांगरांचे पोलिसांबाबत केलेले वक्तव्य हे सगळं चिथावणीखोर नाही का? पण या सगळ्यापैकी एकावरही काहीच कारवाई केली जात नाही असं त्या म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या