युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
ध्रुव राठीने आपल्या यूट्यूब चॅनेलवर साधारण दोन मिनिटांचा व्हिडीओ अपलोड केला आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील यंदाच्या बदललेल्या राजकीय समीकरणामुळे निवडणूक निकालाचा अंदाज वर्तवणे कठीण बनलं आहे. त्यामुळेच, येथील निवडणुकीत यंदा महाविकास आघाडाली पसंती मिळणार की महायुतीला पुन्हा निवडून देणार हे पाहणे आत्सुक्याचे आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्ध युट्यूबर आणि सत्ताधारी प्रवाहाच्याविरोधी भूमिका घेत आपली बाजू मांडणाऱ्या ध्रुव राठीचेही (Dhruv rathi) महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे. त्यामुळेच, राठी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचारात आपण सहभागी होत प्रचार करणार असल्याचे म्हटले. मात्र, त्यासाठी महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांपुढे काही अटी ठेवल्या आहेत.
ध्रुव राठीने आपल्या यूट्यूब चॅनेलवर साधारण दोन मिनिटांचा व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत राठी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत, असं म्हटलंय. यासह ध्रुव राज्यात कोणकोणत्या क्षेत्रात विकास व्हायला हवा, हेही सांगितलंय. त्यासाठी, त्याने 8 आव्हानं दिली असून जो नेते ते आश्वासन पूर्ण करेन, त्यांचा प्रचार करणार असल्याचंही राठी यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांनी त्यांचं आव्हान स्वीकारलं असून रोहित पवार यांनीही ट्विट करुन दुजोरा दिला आहे.
ध्रुव राठींचं महाराष्ट्रातील नेत्यांना खुलं आव्हान
ध्रुव राठी हा प्रसिद्ध युट्युबर असून त्यांचे युट्युबला 2.5करोड (फॉलोवर्स, सब्स्क्रायबर्स) आहेत. यंदाच्या निवडवणुकीत महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना युट्युबवर विडिओ पोस्ट करुन त्यांनी आव्हान दिलं आहे. विडिओमध्ये राठी म्हणाला की, जो नेता आव्हान स्वीकारेल आणि पूर्ण करेल, त्यांचा प्रचार मी करेल आणि जर आव्हान पूर्ण केलं नाही तर माझ्यासोबत आणि माझ्या व सब्स्क्रायबर्ससोबत गाठ आहे.
Nice to see @dhruv_rathee ‘s challenge to all parties on their development and governance agenda being accepted by @AUThackeray ji.
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) November 15, 2024
Here’s to a MVA’s prosperous, inclusive & development agenda for all.
MVA is coming! pic.twitter.com/I6kXYExx0a
ध्रुव राठीने मिशन 'स्वराज' मधून महाराष्ट्रातील नेत्यांपुढे 8 आव्हानं ठेवली आहेत.
1. आपल्या छत्रपती शिवाजी महाराज च्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा आहे.
2. शेतकऱ्यांना चांगले प्रशिक्षण देणे, माती परीक्षण प्रयोगशाळा उभारणे, माती परीक्षण प्रयोगशाळा उभारणे,
3. शेतकऱ्यांसाठी अनेकी ठिकाणी बाजारपेठ उभा करणे.
4. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि मोफत चांगले आरोग्य व्यवस्था
5. नागरिकांना चांगलं हवा व पाणी मिळावे.
6. राज्यामधील गुन्हेगारापासून मुक्ती मिळवून द्यावी, सर्व नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे.
7. छोट्या व्यापाऱ्यांना पुढे येण्यासाठी मदत करणे, सर्वाना रोजगार मिळवून देणे.
8. नागरिकांना सुद्धा आव्हान केलं की, सर्वानी एकत्र आले पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी लढायला पाहिजे.
हेही वाचा
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार