एक्स्प्लोर

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त

BKC Metro Station Fire : बीकेसी मेट्रोच्या काम सुरू असलेल्या भागात दुपारी आग लागल्याची घटना घडली होती. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.  

मुंबई : वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC Metro Station) मेट्रो स्टेशनच्या परिसरात लागलेली आग आटोक्यात आल्यानंतर आता बीकेसी मेट्रो पूर्ववत झाली आहे. दुपारी एक वाजेच्या सुमारास बीकेसी मेट्रोच्या काम सुरू असलेल्या परिसरात ही आग लागली होती. त्यानंतर मेट्रो काही वेळासाठी बंद करण्यात आली होती. आता पुन्हा दुपारी 2.45 मिनिटांनी ही मेट्रो सुरू करण्यात आली आहे. 

मुंबई मेट्रोने यासबंधित एक निवेदन प्रसिद्ध केलं असून त्यामध्ये म्हटलंय की, "मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (MMRC) कडून कळविण्यात येते की, आज, 15 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी अंदाजे 1.00 वाजता बीकेसी मेट्रो स्थानकाच्या अद्याप कार्यान्वित नसलेल्या A4 प्रवेश/निकास द्वारा बाहेर आग लागली. या प्रवेश द्वारा जवळ सध्या कामे सुरू असून हे सध्या प्रवाशांसाठी खुले करण्यात आलेले नाही.  या आगीमुळे  काही भागात धूर पसरला. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बीकेसी स्थानकावरील सेवा तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आली होती.

 

मात्र, आरे-जोगेश्वरी- वांद्रे कॉलनी दरम्यानची इतर मेट्रो सेवा नेहमीप्रमाणे सुरू होती. मुंबई अग्निशमन दलाने परिस्थिती नियंत्रणात आणली असून एमएमआरसी आणि डीएमआरसीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.

फायर ब्रिगेडने आग पूर्णपणे विझवल्यानंतर आणि दुपारी 2.45 वाजता त्यांची परवानगी मिळाल्यानंतर बीकेसी स्थानकावरील सेवा पूर्ववत करण्यात आल्या. या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

BKC Metro Station Fire :  नेमकं काय घडलं होतं? 

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मेट्रो स्टेशनचे काम सुरु असलेल्या परिसरात आज दुपारी 1 वाजून 9 मिनिटांच्या सुमारास आग लागली होती. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे कार्य सुरू आहे. सुमारे 40 ते 50 फूट खोल तळघरातील लाकडी साठा आणि फर्निचर असलेल्या ठिकाणी ही आग पसरली होती. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या आणि स्थानिक पोलिसांची टीम पोहोचली. नंतर सर्वच प्रवाशांना अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमधून बाहेर काढण्यात आलं. दरम्यान, या आगीच्या घटनेमुळे स्टेशनबाहेर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. . 

बीकेसी मेट्रो स्टेशन जमिनीच्या खाली असल्याने आग पसरली असती तर वित्तहानी होण्याचा मोठा धोका होता. लाकडाच्या साठ्याला आग लागल्यानंतर धुराचे प्रचंड लोट मेट्रो स्थानकाच्या परिसरात पसरले. त्यावेळी सर्व प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. ही आग विझवण्यसाठी घटनास्थळी अग्निशामन दलाच्या 12 ते 13 गाड्या दाखल झाल्याने याठिकाणी रस्ते वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. 

ही बातमी वाचा :

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget