एक्स्प्लोर

Sanjay Raut : सोमय्यांनी संयम बाळगावा, आणखी प्रकरणे बाहेर येणार आहेत, राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : देश पुन्हा फाळणीच्या दिशेनं जातोय अशी भीती वाटतेय. आज बाबासाहेब आंबेडकर असते तर अश्रू ढाळले असते असे यावेळी सोमय्या म्हणाले.

Sanjay Raut : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर Save INS Vikrant या मोहीमेखाली पैसे जमा करून 57 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत आयएनएस विक्रांतच्या पैशांचा अपहार झाला आहे, तसेच या प्रकरणी आरोपी निर्दोष नाहीत, त्यामुळे उगाच वचवच करू नये अशा आक्रमक शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना लक्ष्य केले. भाजप (BJP) नेते किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) हायकोर्टानं मोठा दिलासा दिला असून. मुंबई उच्च न्यायालयानं किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. तसेच, अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, सोमवार 18 एप्रिलपासून सलग चार दिवस चौकशीला हजेरी लावण्याचे निर्देशही किरीट सोमय्यांना दिले आहेत. दरम्यान, किरीट सोमय्यांनी संयम बाळगावा, आणखी प्रकरणे बाहेर येणार आहेत असे सांगत संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधत भाजप नेते किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे. आणखी काय म्हणाले राऊत?

महाविकास आघाडीच्या नेत्यांना जामीन का मिळत नाही?
विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच अटकेपासून संरक्षण मिळतंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांना जामीन का मिळत नाही? असा सवाल राऊतांनी केला आहे. तसेच न्यायव्यवस्थेत विशिष्ट विचारसरणीचे लोक आहेत असे सांगत राऊतांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. 

देश पुन्हा फाळणीच्या दिशेनं जातोय अशी भीती
देशाच्या न्यायव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली आहे, देश पुन्हा फाळणीच्या दिशेनं जातोय अशी भीती वाटतेय. आज बाबासाहेब आंबेडकर असते तर अश्रू ढाळले असते असे यावेळी सोमय्या म्हणाले.

निवडणुकांसाठी वातावरण बिघडवण्याचं काम
रामनवमीच्या दिवशी घडलेल्या दंगली ही निवडणुकांची तयारी सुरू आहे. अशातच निवडणुकांसाठी वातावरण बिघडवण्याचं काम सुरू आहे, दंगलीच्या घटनांवरून राऊतांनी विरोधकांवर नाव न घेता हल्लाबोल केला आहे.

अखंड हिंदुस्थानाची भाषा करणाऱ्यांना टोला
अखंड भारताला कोणताही पक्ष विरोध करणार नाही. आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या, आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा, अखंड हिंदुस्थानाची भाषा करणाऱ्यांना राऊतांनी टोला लगावला आहे.

आम्ही दमडीचाही घोटाळा केला नाही: सोमय्या 

कथित आयएनएस विक्रांत घोटाळ्या प्रकरणी बोलताना ते म्हणाले आहेत की, ''आम्ही दमडीचाही घोटाळा केलेला नाही. 58 कोटींची भाषा संजय राऊत यांनी वापरली होती. हा आठवा आरोप होता आणि आठी आरोपांमध्ये एकही कागदी पुरावा नाही. फक्त स्टंटबाजी करत दोन-पाच दिवस मीडियाचं अटेंशन मिळवायचं. न्यायालयावर मला विश्वास आहे. न्याय मिळायची सुरुवात झाली आहे.'' 

संबंधित बातमी: 

किरीट सोमय्यांना हायकोर्टाचा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर, तर चौकशीला हजर राहण्याचे निर्देश

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त स्वरुपात फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त स्वरुपात फक्त एका क्लिकवर...
Narendra Mehta and Asgar ali vora: भाजपच्या नरेंद्र मेहतांनी अखेर पंतप्रधान मोदींच्या वर्गमित्राची जमीन परत केली, पोलीस तक्रारही मागे घेतली, मीरा भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
भाजपच्या नरेंद्र मेहतांनी अखेर पंतप्रधान मोदींच्या वर्गमित्राची जमीन परत केली, पोलीस तक्रारही मागे घेतली, मीरा भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil: उपोषणात दौरा चांगला नाही, त्रास होत असल्याने दौरा रद्द करू शकतो, मनोज जरांगे यांचं सूतोवाच, बीडच्या पाटोदा येथे रात्री दोन वाजता सभा
उपोषणात दौरा चांगला नाही, त्रास होत असल्याने दौरा रद्द करू शकतो, मनोज जरांगे यांचं सूतोवाच, बीडच्या पाटोदा येथे रात्री दोन वाजता सभा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: उपोषणात दौरा चांगला नाही, त्रास होत असल्याने दौरा रद्द करू शकतो, मनोज जरांगे यांचं सूतोवाच, बीडच्या पाटोदा येथे रात्री दोन वाजता सभा
उपोषणात दौरा चांगला नाही, त्रास होत असल्याने दौरा रद्द करू शकतो, मनोज जरांगे यांचं सूतोवाच, बीडच्या पाटोदा येथे रात्री दोन वाजता सभा
UPI Charge Rules : UPI द्वारे पेट्रोल, डिझेल आणि CNG भरणे महाग होणार, UPI पेमेंटच्या नव्या नियमाने काय बदलणार? वाचा सविस्तर
UPI द्वारे पेट्रोल, डिझेल आणि CNG भरणे महाग होणार, UPI पेमेंटच्या नव्या नियमाने काय बदलणार? वाचा सविस्तर
Sunil Lodhi : आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
Manoj Jarange : जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
Narendra Mehta and Asgar ali vora: भाजपच्या नरेंद्र मेहतांनी अखेर पंतप्रधान मोदींच्या वर्गमित्राची जमीन परत केली, पोलीस तक्रारही मागे घेतली, मीरा भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
भाजपच्या नरेंद्र मेहतांनी अखेर पंतप्रधान मोदींच्या वर्गमित्राची जमीन परत केली, पोलीस तक्रारही मागे घेतली, मीरा भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
सोनं,चांदी,डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
Embed widget