25th August In History: पोलोमध्ये भारताने 1957 सालची चॅम्पियनशिप जिंकली, क्रिकेटमध्ये शेन वॉर्नचा 400 बळींचा टप्पा; आज इतिहासात
25th August Important Events : चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे जगप्रसिद्ध अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग (Neil Armstrong) यांचे निधन 25 ऑगस्ट 2012 रोजी झालं होतं.
25th August Important Events : क्रिडा जगताशी संबंधित तीन महत्त्वाच्या घटना इतिहासात 25 ऑगस्ट या तारखेला नोंदल्या गेल्या. पहिल्या घटनेबद्दल बोलायचे झाले तर, 1957 मध्ये, 25 ऑगस्ट रोजी, भारतीय पोलो संघाने फ्रान्समध्ये खेळल्या गेलेल्या जागतिक पोलो चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावले होते. दुसऱ्या घटनेत, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा शेन वॉर्नने 25 ऑगस्टलाच 400 बळींचा टप्पा पार केला. तिसरी घटना 2018 जकार्ता आशियाई खेळांशी संबंधित आहे, जेव्हा भारताचा शॉटपुट अॅथलीट तेजिंदरपाल सिंग तूर याने विक्रमी कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले होते.
देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 25 ऑगस्ट या तारखेला नोंदवलेल्या इतर काही महत्त्वाच्या घटना पुढीलप्रमाणे आहेत.
1351: सुलतान फिरोजशाह तुघलकचा तिसरा राज्याभिषेक.
1609 : इटालियन खगोलशास्त्रज्ञ गॅलेली गॅलीलियो यांनी वेनेशियन व्यापार्यांना आपली नवीन निर्मिती, दुर्बिणीचे प्रात्याक्षिक दाखविले.
गॅलिलिओने (Galileo Galilei) हायड्रोस्टॅटिक तराजू बनविला. गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून दाखविणारी दुर्बीण तयार केली. अज्ञात असलेले अनेक ग्रह, तारे यांचे निरीक्षण करता येऊ लागल्याने खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध या दुर्बिणीमुळे लागले.
1908 : नोबल पारितोषिक पुरस्कार सन्मानित किरणोत्सारी वर्गाचा शोध लावणारे महान फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंता हेनरी बेक्वरेल (Antoine Henri Becquerel) यांचे निधन.
1916: टोटेनबर्गच्या लढाईत रशियाने जर्मनीचा पराभव केला.
1923 : प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, साहित्यक, समीक्षक आणि अर्थतज्ञ तसचं, 56 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर गाडगीळ यांचा जन्मदिन.
1940: लिथुआनिया, लाटव्हिया आणि एस्टोनिया सोव्हिएत युनियनमध्ये सामील झाले.
1941 : संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांचा जन्मदिन
मराठी गीतकार आणि संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांचा जन्म 25 ऑगस्ट 1941 रोजी झाला. त्यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांना, जाहिरातींना व दूरदर्शन मालिकांना संगीत दिले आहे. आठ हजारांहून जास्त जिंगल्स, चारशे नाटकांचे संगीत, सव्वाशे चित्रपटांना संगीत, 500 मालिकांची शीर्षकगीते त्यांच्या नावावर आहेत.
1957: भारतीय पोलो संघाने विश्वचषक जिंकला.
1963: सोव्हिएत युनियनचे नेते जोसेफ स्टॅलिन यांच्या 16 विरोधकांना फाशी देण्यात आली.
1980: झिम्बाब्वे संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
1988: इराण आणि इराक यांच्यातील दीर्घ युद्धानंतर थेट चर्चेची फेरी सुरू झाली.
1991: बेलारूस सोव्हिएत युनियनपासून वेगळा झाला आणि स्वतंत्र देश बनला.
1992: ब्रिटीश वृत्तपत्राने प्रिन्सेस डायनाच्या संभाषणाचा तपशील प्रसिद्ध केला, ज्यामध्ये तिने प्रिन्ससोबतच्या तिच्या लग्नाबद्दल नाराजी व्यक्त केली.
1997: मासूमा इब्तेकर इराणच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती झाल्या.
2001: ऑस्ट्रेलियन लेग-स्पिनर शेन वॉर्नने (Shane Warne) कसोटी क्रिकेटमध्ये 400 कसोटी बळी घेतले.
2003: मुंबईत कार बॉम्बस्फोटात 50 हून अधिक लोक ठार आणि 150 हून अधिक जखमी.
2011: श्रीलंका सरकारने 30 वर्षांनंतर देशात घोषित आणीबाणी मागे घेतली.
2012 : चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे जगप्रसिद्ध अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग (Neil Armstrong) यांचे निधन.
2018: भारताचा शॉटपुट अॅथलीट तेजिंदरपाल सिंग तूर याने जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत विक्रमी कामगिरी करून सुवर्णपदक जिंकले.
ही बातमी वाचा: