MACCIA : महाराष्ट्र चेंबरचे 21 उद्योजकांचे शिष्टमंडळ इंडोनेशियाला रवाना, नवीन गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न
Maharashtra Chamber of Commerce : उद्योजकांचे हे शिष्टमंडळ इंडोनेशियात `मॅग्नेटिक महाराष्ट्र` या संकल्पनेचे सादरीकरण करणार आहे.

मुंबई : इंडोनेशिया सरकारच्या आमंत्रणावरुन आणि भारत सरकारच्या सहकार्याने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स (Maharashtra Chamber of Commerce), इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे 21 उद्योजकांचे शिष्टमंडळ आज जकार्ता-इंडोनेशिया दौऱ्यासाठी रवाना झाले. 19 ऑक्टोबर पर्यंत हा दौरा असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे शिष्टमंडळ इंडोनेशियाला रवाना झाले. या शिष्टमंडळाचे जकार्ता आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडोनेशियाचे भारतातील महावाणिज्यदूत जनरल एड्डी वर्दोयो यांनी स्वागत केले. इंडोनेशिया सरकारतर्फे महावाणिज्यदूतांनी केलेला विशेष सन्मान पाहून महाराष्ट्र चेंबरचे शिष्टमंडळ भारावून गेले.
या दौऱ्यात महाराष्ट्रात नवीन तंत्रज्ञान व भांडवली गुंतवणूक, महाराष्ट्रातून निर्यात वृद्धीसाठी नवीन क्षेत्रांची निवड या प्रमुख उद्देशाने इंडोनेशिया येथे विविध बैठकीचे आयोजन इंडोनेशिया आणि भारत सरकारने केले आहे. या दौऱ्यात शिष्टमंडळ `मॅग्नेटिक महाराष्ट्र` या संकल्पनेचे सादरीकरण करणार आहे. बिझनेस ग्रुपसोबतबी टू बी मिटींग, इंडोनेशियाच्या काऊन्सुलेट कार्यालयासोबत बैठक, महाराष्ट्र चेंबर आणि इंडोनेशियामध्ये महत्वपूर्ण विषयावर करार केले जाणार आहेत. जकार्ता येथील इंडियन दूतावास सोबत बैठक होणार आहे. 38 वे ट्रेड एक्स्पो इंडोनेशिया 2023 च्या उद्घाटनासाठी शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे.
शिष्टमंडळात उद्योगपती एस. डी. परब, रमाकांत मालू, भरत येवला, सतीश लोणीकर, श्रीकांत पडोळ, संदीप नागोरी, नितीन इंगळे, मिलींद सांघवीकर, प्रमोद सांगोडे, भरत वखारिया, अर्जुन गायके, जयेश गायके, सुशीलकुमार सिंग, तरंजीतसिंग बग्गा, राधिका परब, अनिल परब, मिलींद बर्वे, मनोज झंवर, नंदकुमार शहा, चेंबरचे चीफ एक्झिकेटिव्ह ऑफिसर नितीन भट आदींचा समावेश आहे.
महावाणिज्यदूत जनरल एड्डी वर्दोयो यांनी भारत व इंडोनेशिया यांचे वाणिज्य, पर्यटन व सांस्कृतिक संबंध अतिशय चांगले असून उभय देशांमधील व्यापार व पर्यटन वाढीबरोबरच सांस्कृतिक संबंध वृध्दिगत करण्यासाठी आपले कार्यालय प्रभावीपणे कार्य करेल, अशी ग्वाही दिली. तसेच व्यापार व पर्यटनासंबंधी संयुक्त कार्यक्रमाच्या कार्यकक्षा निश्चिलतीसाठी महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकाऱ्यांना इंडोनेशिया भेटीचे निमंत्रण दिल्याचे सांगितले.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
