यात हमसाफर एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, स्वर्ण जयंती एक्सप्रेस यांसारख्या अनेक रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.
भारतीय रेल्वे गाड्यांची नावे अत्यंत विचारपूर्वक ठरवतात.
यात भारताची संस्कृती, इतिहास, भूगोल आणि देशातील अनेक वास्तूंचा समावेश असतो.
हमसफर एक्सप्रेस रेल्वे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी असते. हमसफर नावामध्ये प्रवाशांसोबतच्या सहप्रवासाचा सोबतीचा साथीदार असण्याचा भाव व्यक्त होतो.
काशी-महाकाल एक्सप्रेस उत्तर प्रदेशातील वाराणसी जंक्शन आणि मध्य प्रदेशातील इंदोर जंक्शनला जोडते. यामुळे भारतीय संस्कृतीचा वारसा जपला जातो.
वंदे भारत एक्सप्रेस देशप्रेम, देशभक्ती आणि राष्ट्रगौरव दर्शविणारे आहे.
राजधानी एक्सप्रेस ही देशाची राजधानीला जोडणारी ट्रेन आहे.
वेगवान रेल्वेसेवेच्या सुविधांसाठी शताब्दी एक्सप्रेस चालविली जाते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.