Bank Holidays: बँकांना सलग चार दिवस सुट्ट्या, घर सोडण्यापूर्वी ही माहिती जरुर वाचा
सणांच्या काळात नोकदारांना अनेक सुट्या मिळणार आहेत. विशेषत: दसऱ्यानिमित्त बँकांना सुट्या असणार आहेत. सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत.
Bank Holidays: सध्या देशभरात सणासुदींचा उत्साह सुरु झाला आहे. उद्यापासून (15 ऑक्टोबर) नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. इथून पुढे एकापाठोपाठ सण सुरुच राहणार आहेत. या सणांच्या काळात नोकदारांना अनेक सुट्या मिळणार आहेत. विशेषत: दसऱ्यानिमित्त बँकांना सुट्या असणार आहेत. सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत.
दसऱ्यामुळे निर्माण होणारी परिस्थिती
सणांमुळे अनेक ठिकाणी बँका बंद राहणार आहेत. याला ऑक्टोबरचा लाँग वीकेंड म्हटले जात आहे. सलग चार दिवस बंद राहणार आहेत. साधारणपणे बँकांना एक किंवा दोन दिवसांची साप्ताहिक सुट्टी असते. महिन्यातील सर्व रविवार व्यतिरिक्त दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही बँकांना सुट्टी असते. या कारणास्तव, बँकांमध्ये दर दुसऱ्या आठवड्यात दोन दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार सुट्ट्या असतात.
पुढच्या आठवड्यात लाँग वीकेंड
अनेक राज्यांमध्ये 21 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर अशी सलग चार दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. 21 ऑक्टोबर हा महिन्याचा तिसरा शनिवार असला तरी त्या दिवशी महासप्तमीमुळं अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे. त्रिपुरा, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये 21 ऑक्टोबरला बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर 22 ऑक्टोबरला रविवार असेल त्यामुळं देशभरातील बँका बंद राहतील.
या तीन राज्यांमध्ये बँका बंद राहतील
सोमवारी 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या निमित्ताने त्रिपुरा, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहतील. अशाप्रकारे त्रिपुरा, आसाम आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांमध्ये सलग चार दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.
महिन्याची सुरुवात सुट्टीने
यावर्षीचा ऑक्टोबर महिना सुट्ट्यांच्या दृष्टीनं खास ठरत आहे. महिन्याची सुरुवात मोठ्या सुट्टीने झाली आहे. महिन्याची पहिली तारीख म्हणजेच 1 ऑक्टोबर रविवार असल्यानं संपूर्ण देशात बँकांना सुट्टी होती. त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त सुट्टीमुळं देशभरातील बँका बंद होत्या. त्यानंतर आता हा चार दिवसांचा वीकेंड आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: