Breaking News LIVE | कुख्यात गुंड गजा मारणे थेट न्यायालयात हजर, पोलिसांच्या हातावर तुरी देत जामीन मिळवला
Breaking News LIVE Updates, 25 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच, मुंबईत 119 दिवसांनी 1000 हून जास्त रुग्ण
एकीकडे देशभरात कोरोना लसीकरणाचं अभियान सुरु आहे, दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. आज (24 फेब्रुवारी) पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली. मागील 24 तासाच महाराष्ट्रात 8 हजार 807 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सोबतच आज कोरोनामुळे 80 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 2772 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात एकूण 20 लाख 08 हजार 623 रुग्ण बरे घरी परतले आहेत. सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 59 हजार 358 आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70 टक्के झालं आहे.
पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला; रोहित शर्माचं दमदार अर्धशतक
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तिसर्या कसोटी सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. पहिल्या डावात केवळ 112 धावांवर इंग्लंडला गुंडाळून गोलंदाजीनंतर टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन गडी गमावून 99 धावा केल्या. पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर रोहित शर्मा 57 आणि अजिंक्य रहाणे एका धावांवर नाबाद परतला.
मुंबई ते नवी मुंबई जल वाहतूक यावर्षी सुरू होणार
कोरोना काळात लोकल बंद असल्याने नवी मुंबईतून मुंबईला येणाऱ्या अनेकांना रस्त्यावरच्या खड्ड्यातून मार्ग काढत अतिशय खडतर प्रवास करावा लागला होता. अजूनही सर्वांसाठी पूर्णवेळ लोकलचे दरवाजे सुरू झालेले नाहीत. मात्र लवकरच या सर्व प्रवाशांसाठी एक वाहतुकीचा नवीन पर्याय खुला होणार आहे. येत्या काही महिन्यातच मुंबई ते नवी मुंबई जल वाहतूक सुरू होणार आहे. या वर्षीच मुंबईतील प्रिन्सेस डॉक ते बेलापूर अशी जल वाहतूक कार्यान्वित केली जाणार आहे. येत्या 2 ते 4 मार्च दरम्यान मेरीटाईम इंडिया समिट होणार आहे. त्यात जगभरातील अनेक देश आणि कंपन्या सहभागी होतील. यावर्षी या समिटचे दुसरे वर्ष असून कोरोना मुळे व्हर्चुअल पद्धतीने ही समिट होणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे.