LIVE UPDATES | नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सामान्यांना झटका
Breaking News LIVE Updates, 31 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह या ब्लॉगमध्ये...
LIVE
![LIVE UPDATES | नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सामान्यांना झटका LIVE UPDATES | नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सामान्यांना झटका](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
Background
नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सामान्यांना झटका
Pan Card ला Aadhar Card लिंक करण्यासाठी मुदतवाढ; आयकर विभागाचा निर्णय
पॅनकार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे मुदतवाढ देण्यात आल्याचं ट्वीट आयकर विभागाने केलं आहे. आता 30 एप्रिल 2021 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यातील मुद्रांक शुल्क सवलत संपुष्टात
राज्यातील बांधकाम व्यवसायाला ऊर्जितावस्था येण्याच्या दृष्टिकोनातून गतवर्षी राज्यशासनाने दिनांक 31 मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कात सवलत दिली होती, सदर सवलत संपुष्टात आली असून यापुढे नियमित स्वरूपात मुद्रांक शुल्काचे दर लागू राहतील. तथापि महिलांच्या नावाने घरांसाठी होणाऱ्या खरेदी विक्री दस्तावर मुद्रांक शुल्कातून 1 टक्का सवलत देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. सदर सवलत 1 एप्रिल 2021 पासून लागू होईल, बाळासाहेब थोरात यांची माहिती
परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यास तयार
परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यास तयार. केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांची हायकोर्टात माहिती. चौकशी सीबीआय मार्फत करायची की ईडी मार्फत याचे निर्देश हायकोर्टानं द्यावेत
पालघर जिल्ह्यात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा नवीन आदेश
पालघर जिल्ह्यात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा नवीन आदेश देण्यात आले असून सायंकाळी 8 ते सकाळी 7 पर्यंत जमाव बंदी राहील. नियमांचं उल्लंघन करणाऱ्याकडून 1000 रुपये दंड आकारण्यात येईल, तर सार्वजनिक ठिकाण, बगीचे, समुद्र किनारे, उद्यान येथे सुद्धा हाच नियम लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे विना मास्क फिरणाऱ्यालाही 500 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याकडून 1000 रुपये दंड आकारण्यात येईल. लग्न समारंभावर 15 एप्रिल पासून घातलेली बंदी उठविण्यात आली असून 50 लोकांच्या मर्यादेत ही परवानगी स्थानिक पोलीस ठाण्यातून मिळणार आहे. बाजारपेठा, बार, रेस्टॉरंट खाद्यगृह परमिट रूम सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)