Beed: विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी पतीला सात वर्षे सक्तमजुरी; अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल
Beed: पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी आंबेजोगाई सत्र न्यायालयाने पतीला सात वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

बीड: स्वयंपाक चांगला येत नाही, काम करता येत नाही अशा कारणावरून नवरा, सासू-सासरे हे शिवीगाळ व मारहाण करत होते. यालाच कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि याच प्रकरणी विवाहितेच्या पतीला सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा अंबाजोगाई सत्र न्यायालयाने सुनावली.
चार वर्षानंतर लागला निकाल
ही घटना बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील साकुर या गावी घडली होती विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले होते. अंबाजोगाई सत्र न्यायालयाने पतीला सात वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
रहिमखा ईस्माइल पठाण असे आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात शेख बशीर शेख शेरजंग रा. मुलतानी तांडा, साकुड, ता, अंबाजोगाई यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची मयत मुलगी भुशेराबी यांचा विवाह सन 2014 मध्ये आरोपी रहिमखा ईस्माइल पठाण याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर बुशराबी नांदण्यासाठी गेली असता तिचा पती व सासू-सासरे हे बुशेराबीला ऊस तोडणीच्या कामासाठी कारखान्याला घेवून गेले होते.
पती मारहाण करून पुण्याला निघून गेला
घरातील लहान-मोठ्या कामामुळे बुशेराबीला सासू-सासरे आणि पती त्रास देत होता. स्वयंपाक चांगला येत नाही, काम करता येत नाही. अशा कारणावरून नवरा, सासू-सासरे हे शिवीगाळ व मारहाण करत होते. ऊस तोडणीवरून गावी आल्यानंतर सन 2016 मध्ये तिचा नवरा रहिमखा तिला मारहाण करून पुणे येथे निघून गेला. त्यानंतर दोन वर्षांनी परत आल्यानंतर फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी मध्यस्थी करून मुलगी बुशेराबी हिला नांदविण्यास पाठविले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी बुशेराबीला लातूर येथे घेवून गेला आणि तिला लातूरहून वाघाळा कारखाना येथे तिला एकटीच सोडून गेला. त्यानंतर बुशेराबी एकटीच साकुड येथे आली. 28 जून 2018 रोजी मयत बुशेराबी हिने त्रासास कंटाळून राहत्या घरी पत्राच्या आडुला गळफास घेवून आत्महत्या केली होती.
या आत्महत्येप्रकरणी या प्रकरणाच्या दुसऱ्या दिवशी अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणांमध्ये सरकारी पक्षाने एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. त्यांची साक्ष ग्राह्य धरून तसेच सरकारी वकील यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश व्ही.के. मांडे यांनी आरोपीला सात वर्षे सक्तमजूरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
