एक्स्प्लोर

Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांना न्यायालयात हजर होण्याचे आदेश; स्वतः कोर्टात हजर राहाणार?

Maharashtra News: Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराज हाजीर हो... अपत्य प्राप्तीसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आज सुनावणी, इंदोरीकर महाराज स्वतः हजर राहणार का? याकडे लक्ष.

Indurikar Maharaj :  PCPNDT कायद्यानुसार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची आज संगमनेर (Sangamner) प्रथम वर्ग न्यायालयात सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीसाठी इंदोरीकर महाराजांना समन्स बजाविण्यात आलं आहे. इंदोरीकर महाराज स्वतः आज न्यायालयात हजर राहाणार का? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

अपत्य प्राप्ती संदर्भात फेब्रुवारी 2020 मध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्यावर जुलै 2020 मध्ये PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या वक्तव्यावर आक्षेप घेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी इंदोरीकरांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र संगमनेर सत्र जिल्हा न्यायालयाने इंदोरीकरांना गुन्ह्यातून मुक्त केल्यानंतर अंनिसनं औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करून इंदोरीकर महाराजांविरोधात खालच्या कोर्टात खटला चालवण्याचा आदेश दिला. या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी इंदोरीकरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यानुसार इंदोरीकर महाराजांवर दाखल प्रकरणाची संगमनेरचा प्रथम वर्ग न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी इंदोरीकर महाराज यांना समन्स बजाविण्यात आले असून ते हजर राहण्याची शक्यता आहे.. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण? 

इंदुरीकर महाराज यांनी शिर्डी येथील ओझरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनात एक वक्तव्य केले होते. सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते, असं इंदुरीकर म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्या याच वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला होता. इंदुरीकर यांचे हे वक्तव्य म्हणजे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच PCPNDT सल्लागार समितीने इंदुरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान याच काळात इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून प्रथम वर्ग न्यायालयात 156 (3) याचिका करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सत्र न्यायालयाने हा आदेश रद्द केला होता. 

या निर्णयाच्या विरोधात ॲड. रंजना गवांदे यांनी ॲड. जितेंद्र पाटील व ॲड. नेहा कांबळे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना खंडपीठाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला होता. मात्र औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला देखील इंदुरीकर यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पण, सर्वोच्च न्यायालयाने देखील औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत इंदुरीकर यांची याचिका निकाली काढली होती. 

काय म्हणाले होते निवृत्ती महाराज इंदुरीकर?

स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशा वेळेला झाला तर अपत्ये रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वॉलिटी खराब, असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकश्यपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला, असं इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनात म्हटलं होतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी सक्सेस स्टोरी
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी 'सक्सेस स्टोरी'
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
BMC : महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

IND vs AUS Champions Trophy  : भारताची ऑस्ट्रेलियावर चार विकेट्सनी मात, 264 धावात गुंडाळलंABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 04 March 2025Job Majha : डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधीPM Modi at Vantara : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वनतारा वाईल्ड लाईफचं उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी सक्सेस स्टोरी
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी 'सक्सेस स्टोरी'
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
BMC : महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते, फडणवीसांनी एका वाक्यात भरला दम; राष्ट्रवादीच्या नेत्यानं मंत्रि‍पद सोडलं
धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते, फडणवीसांनी एका वाक्यात भरला दम; राष्ट्रवादीच्या नेत्यानं मंत्रि‍पद सोडलं
Jitendra Awhad : Krushna Andhale ची हत्या झालीय;जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट Santosh Deshmukh
Jitendra Awhad : Krushna Andhale ची हत्या झालीय;जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट Santosh Deshmukh
Embed widget