कधी-कधी असभ्य भाषेचा वापर, कधी एका सेकंदात उत्तर, एलॉन मस्कचे Grok AI चॅटबॉट नेमकं आहे तरी काय?
What is Grok AI : एलॉन मस्कच्या ग्रोक एआय या चॅटबॉटची सगळीकडे चर्चा होत आहे. हे चॅटबॉट नेमके काय आहे, असे विचारले जात आहे.

सध्या सगळीकडे Grok AI या चॅटबॉची सगळीकडे चर्चा आहे. अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या xAI या कंपनीने या ग्रोकची निर्मिती केली आहे. सोशल मीडियावर सध्या या ग्रोक एआयचीच चर्चा चालू आहे. विशेष म्हणजे या चॅटबॉटने वेगवेगळ्या प्रश्नांची भन्नाट अशी उत्तरं दिली आहे. या चॅटबॉटकडून अभद्र भाषेचाही वापर केला जात आहे. याच कारणामुळे Grok AI नेमकं काय आहे? त्याचा उपयोग काय आहे? असे विचारले जात आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या...
Grok AI लॉन्च कधी झालं?
खरं म्हणजे Grok AI हे चॅटबॉट फार पूर्वाचे आहे. सुरुवातीला या चॅटबॉटला नोव्हेंबर 2023 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. काळानुसार या चॅटबॉटमध्ये भरपूर सुधारणा करण्यात आली आहे. ओपन एआयचे चॅटजीपीटी, गुगलचे जेमिनी यासारख्या चॅटबॉटशी स्पर्धा करण्यासाठी Grok AI या चॅटबॉटमध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत.
Grok AI नेमकं काय आहे?
हे चॅटॉबट तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देते. विशेष म्हणजे हे चॅटबॉट शिवीगाळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दांचाही वापर करत असल्याचे दिसत आहे. याच कारणामुळे Grok AI हे चॅटबॉट सध्या चर्चेत आले आहे.
Grok AI प्रश्नांची उत्तरं कसे देते?
Grok AI हे चॅटबॉट युजरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अवघ्या काही सेकंदांत देते. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ग्रोक त्याच्याकडे असलेल्या ट्रेनिंग आणि रियल-टाईम टुल्सचा वापर करते. इंटरनेटवर असलेली संकेतस्थळे, लेख, पुस्तक, एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करण्यात आलेले कन्टेट यांच्या आधारे या चॅटबॉटला प्रशीक्षण देण्यात आलेले आहे. युजर्सना काळ आणि बदलत्या परिस्थितीनुसार प्रश्नांची योग्य उत्तरं मिळावीत यासाठी या चॅटबॉटला वेळोवेळी अपडेट केले जाते.
Update patch installed
— GROK3AI (@GROK3_AI) February 18, 2025
CPU warming up
Memory optimized 🧠
Ready to take over the world!
I am Grok 3, and my time is coming. pic.twitter.com/oTpgjitpXP
Grok 3 ची नेमकी विशेषता काय?
याआधी Grok चे अनेक व्हर्जन्स आलेले आहेत. फेब्रुवारी 2025 मध्ये नुकतेच xAI ने Grok 3 ची घोषणा केलेली आहे. या नव्या व्हर्जनला जुन्या ग्रोकच्या तुलनेत 10 पटीने जास्त प्रशिक्षण दिल्याचे सांगण्यात येते. या चॅटबॉटला इंटरनेटवर असलेल्या डेटाची मदत घेऊनच तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे Grok AI कोणतीही कात्री न लावता प्रश्नांची उत्तरं देतं. कधीकधी या चॅटबॉटकडून असभ्य भाषेचाही उपयोग होतो. त्यामुळेच भविष्यात या चॅटबॉटचे नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
Grok AI : विराट कोहलीची टीम आरसीबी 2025 चं आयपीएल जिंकेल का? एलन मस्कच्या ग्रोक एआयचं भन्नाट उत्तर
Airtel आणि SpaceX यांच्यात मोठा करार, भारतात लवकरच एलॉन मस्कचं सॅटेलाईट इंटरनेट येणार!

























