नागपूर हिंसाचार प्रकरण! तणाव असलेल्या भागात पोलिसांचा रुट मार्च, आत्तापर्यंत 50 लोकांना अटक
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन सोमवारी नागपूरमध्ये हिंसाचार (Nagpur violence) उफाळल्याची घटना घडली आहे. याचे आता राजकीय क्षेत्रात देखील पडसाद उमटत आहेत.

नागपूर : औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन सोमवारी नागपूरमध्ये हिंसाचार (Nagpur violence) उफाळल्याची घटना घडली आहे. याचे आता राजकीय क्षेत्रात देखील पडसाद उमटत आहेत. सध्या नागपूरमध्ये तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी रुट मार्च काढला. (Police Route March) पोलिस अजून काही लोक अप्रिय घटना घडवण्याच्या तयारीत तर नाहीत ना याची पाहणी करुन अभ्यास करणार आहेत. तसेच परिसरातील नागरिकांच्या पाठीशी सुरक्षेसाठी पोलिस आहेत असा विश्वास दर्शविणार आहेत.
नागपुरात घडलेली घटना ही गंभीर आहे आणि आम्ही या घटनेला सिरीयसली घेत आहोत. यामध्ये जे लोक सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली आहे. वेगवेगळे दृश्य आणि वेगवेगळे माहितीच्या आधारावर कोण मास्टरमाईंड होतं या आधारावर चौकशी करणार असल्याचे सिंगल म्हणाले. दरम्यान, सध्या नागपूरमध्ये तणाच्या स्थितीत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
50 लोकांना अटक करण्यात आली
नागपूरच्या फार छोट्या भागात म्हणजेच काहीशे मीटरच्या परिसरात काल हिंसाचार उसळला होती. आता स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. कालच्या हिंसाचार आणि दगडफेकी संदर्भात विविध पोलीस स्टेशनमध्ये पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे 50 लोकांना अटक करण्यात आली आहे. काही बाहेरचे लोक या हिंसाचारामध्ये सहभागी झाले होते का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र ज्या भागात हिंसाचार उसळला होता, त्याच्या व्यतिरिक्त नागपूरच्या दुसऱ्या भागातील काही लोक तिथे दिसून आले त्या संदर्भात तपास सुरू आहे. काल सकाळी झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनासंदर्भात काहींना आक्षेप होता. त्या संदर्भातली पोलीस तक्रार करण्यात आली होती. त्या संदर्भात पोलिसांनी कारवाई सुद्धा केली आहे. मात्र, याच घटनाक्रम संदर्भात अफवा पसरवण्यात आल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही रिल्स प्रसारित करण्यात आल्या. त्याचाही तपास पोलीस करत आहेत. त्यामुळं जाणीवपूर्वक ही दंगल घडवण्यात आली का असा संशय निर्माण होत आहे. 34 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत, सर्व सध्या धोक्याबाहेर आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
नागपुरममधील महाल परिसरात एका गटातील युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्यांच्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार काल (सोमवारी, ता, 17) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडला आहे. याचा परिणाम शहरातील सामान्य जनजीवनावर झाला आहे. शहराच्या काही भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. पोलिसांनी महाल-गांधी गेटकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर ‘बॅरिकेडींग’ करून मार्ग बंद केले आहेत. त्याचबरोबर या भागातील शाळांना सुट्टी आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जमावबंदी केली आहे.
उपयुक्तांवर केला कुऱ्हाडीने हल्ला
जमावाने एका उपयुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला केला असून इतरांवर दगड व इतर वस्तू फेकल्याने अनेक पोलीस व नागरिक जखमी झाले. त्यापैकी दोन उपयुक्तांसाह एकूण 22 जण इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये पोलीस उपायुक्त झोन 5 निकेतन कदम, पोलीस उपायुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) शशिकांत सातव यांच्यासह एकूण 15 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर 2 अग्निशमन दलाचे जवान आणि 5 नागरिकांनाही जखमी अवस्थेत तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले गेले. दरम्यान निकेतन कदम यांना कुऱ्हाडीचे दोन घाव लागले असून जखम खोल असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तर शशिकांत सातव यांच्या पायावर रॉडने हल्ला केल्याची डॉक्टरांची प्राथमिक माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या:
CM Devendra Fadnavis: नागपूर हिंसाचारात जखमी पोलीस उपयुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला; मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलवरून साधला संवाद, म्हणाले...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

