एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : फडणवीस फडतूस, गृहमंत्री नव्हे हे तर गुंडमंत्री; ठाण्यातील प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली.

Uddhav Thackeray : एक फडतूस गृहमंत्री राज्याला मिळाला आहे. उपमुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून लाचारी, लाळघोटेपणा करणारी व्यक्ती 'फडणवीसी' करत आहे, अशा कठोर शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. सोमवारी रात्री, शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना बेदम मारहाण केली. रोशनी शिंदे यांची आज रुग्णालयात ठाकरे कुटुंबीयांनी भेट घेतली. 

रोशनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे, खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयुक्त कार्यालयात नसल्याने रोशनी शिंदे प्रकरणी चर्चा होऊ शकली नाही. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपला संताप व्यक्त केला. उद्धव यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायलयाने सरकार नपुंसक असल्याचे म्हटले होते. त्याची प्रचिती ठाण्यात आली. एका महिलेला मारहाण करण्यात आली. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. इतकंच काय या पीडित महिलेची तक्रार दाखल करून घेतली नसल्याचे उद्धव यांनी म्हटले. 

फडणवीसांवर निशाणा

राज्यातील सत्तांतरानंतर आज उद्धव ठाकरे कमालीचे आक्रमक दिसले. ठाण्यातील घटनेवरून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. राज्याला फडतूस गृहमंत्री मिळाला असल्याचे त्यांनी म्हटले. स्वत: च्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिंदे गटाच्या लोकांनी बेदम मारहाण केली. तरी, त्यावर कारवाई होत नाही. स्वत: च्या कुटुंबीयांची काही गोष्ट असली की आरोपीला परराज्यातूनही अटक होते, असेही ठाकरे यांनी म्हटले. फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीदेखील उद्धव यांनी केली. 

तुमची गुंडगिरी मोडून काढू

सोमवारी रात्री ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या  रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या महिलांनी हल्ला केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेवरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला आव्हान दिले. तुमची ठाण्यातील नव्हे तर राज्यातील गुंडगिरी मुळासह उखडून टाकण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे, असा सज्जड इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. 

ठाकरे कुटुंबियांनी रोशनी शिंदेंची रुग्णालयात घेतली भेट

रोशनी शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तिथं जाऊन ठाकरे कुटुंबियांनी त्यांची विचारपूस केली. ठाकरे कुटुंबियांनी रोशनी शिंदे यांची विचारपूस करुन त्यांना दिलासा आणि आधार देण्याचा प्रयत्न केला. या घटनेवरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. रोशनी शिंदे यांना आयसीयूमध्ये दाखल करणं हा दिखावा आहे, त्या गर्भवती नाहीत, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. परंतु त्यानंतर ठाकरे कुटुंबियांनी ठाण्यात येणं, रुग्णालयात जाऊन त्यांनी भेट घेणं हा राजकारणचा भाग आहे, असंही शिवसेनेने म्हटलं. मात्र उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात येऊन विचारपूस करणं यावरुन असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला की, ठाकरे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या ते मागे खंबीरपणे उभे आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
Sahyadri Guest House : आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांचे आंदोलन
आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांचे आंदोलन
Maharashtra Assembly Election 2024: मोठी बातमी: उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्रात भाजपचा लिफाफा पॅटर्न, कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार?
उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्रात भाजपचा लिफाफा पॅटर्न, कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार?
पंचायत समितीला जाळ लावून तुम्हाला आत टाकेन, काँग्रेसच्या माजी मंत्र्याची BDO ला शिवीगाळ
पंचायत समितीला जाळ लावून तुम्हाला आत टाकेन, काँग्रेसच्या माजी मंत्र्याची BDO ला शिवीगाळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Doctor on Pune Helicopter Crash : हेलिकॉप्टर कोसळं! घटनास्थळी पोहोचलेल्या डॉक्टरांनी काय पाहिलं?Pune Helicopter Crash Details : टेकऑफनंतर 5व्या मिनिटाला कोसळलं हेलिकॉप्टर, A टू Z माहितीABP Majha Headlines 9 AM : सकाळच्या 9 हेडलाईन्स : एबीपी माझा हेडलाईन्स : 2 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaPune Helicopter Crash Details : हेलिकॉप्टरचा चेंदामेंदा, दोन पायलट मृत्यूमुखी; EXCLUSIVE VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
Sahyadri Guest House : आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांचे आंदोलन
आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांचे आंदोलन
Maharashtra Assembly Election 2024: मोठी बातमी: उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्रात भाजपचा लिफाफा पॅटर्न, कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार?
उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्रात भाजपचा लिफाफा पॅटर्न, कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार?
पंचायत समितीला जाळ लावून तुम्हाला आत टाकेन, काँग्रेसच्या माजी मंत्र्याची BDO ला शिवीगाळ
पंचायत समितीला जाळ लावून तुम्हाला आत टाकेन, काँग्रेसच्या माजी मंत्र्याची BDO ला शिवीगाळ
Surya Grahan 2024 : आज सर्वपित्री अमावस्या; आजच्या दिवशी अजिबात करू नका 'या' चुका, घरावर कोसळेल संकटांचा डोंगर
आज सर्वपित्री अमावस्या; आजच्या दिवशी अजिबात करू नका 'या' चुका, घरावर कोसळेल संकटांचा डोंगर
Karnataka CM Siddaramaiah : ईडीच्या एन्ट्रीनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या भलत्याच पेचात अडकले, म्हणाले, पत्नीच्या त्या निर्णयाने हैराण!
ईडीच्या एन्ट्रीनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या भलत्याच पेचात अडकले, म्हणाले, पत्नीच्या त्या निर्णयाने हैराण!
रोहित पवार, राजेश टोपेंसह 50 जणांना पाडणार, उमेदवारांची यादी तयार, लक्ष्मण हाकेंचा इशारा
रोहित पवार, राजेश टोपेंसह 50 जणांना पाडणार, उमेदवारांची यादी तयार, लक्ष्मण हाकेंचा इशारा
चला शिवस्मारक शोधायला, संभाजीराजे छत्रपतींच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची पहिली मोहीम, हेच का अच्छे दिन, भाजप सेनेला सवाल 
चला शिवस्मारक शोधायला,  संभाजीराजे छत्रपती यांच्या राजकीय पक्षाची पहिली मोहीम, भाजप सेनेला थेट सवाल
Embed widget